
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा-सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा..
आर्ट ऑफ लिविंग संस्थेच्या माध्यमातून व प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तम वायाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेला जलतारा प्रकल्प परतुर मंठा जालना तालुक्यातील 245 गावे पाणीदार होणार आहेत, त्याचबरोबर प्रत्येक गावात व्यसनमुक्ती, तणाव मुक्ती, निरोगी शरीर, आनंदी जीवन हे सुद्धा वेगवेगळ्या शिबिराच्या माध्यमातून होणार आहे, प्रत्येक गावामध्ये आर्ट ऑफ लिविंग चे आनंद अनुभूती शिबिराचे आयोजन शिबिरा पासून होणारे फायदे निरोगी शरीर, आनंदी जीवन, तणाव मुक्त जीवन, व्यसनमुक्ती या अगोदर दिनांक 5 ते 8 जानेवारी दरम्यान मेसखेडा, उमरखेडा, ठेंगेवडगाव, पांढुर्णा, विडोळी, खांडवी वाडी, सोनदेव या ठिकाणी शिबिर घेण्यात आले होते व आता 10 जानेवारी पासून टकले पोखरी, भागडे सावरगाव, दहा, आष्टी या चार ठिकाणी शिबिरास सुरूवात झाली आहे ,प्रशिक्षक प्रा.डॉ.पुरुषोत्तम वायाळ सर, अर्चना वायाळ मॅडम, अश्विनी मॅडम , गजानन वायाळ सर, प्रकाश जाधव सर, मोरेश्वर बोराडे, माऊली नेवरे व सर्व जलतारा स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत.