
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू आहे.आचारसंहितेच्या अनुषंगाने प्राप्त तक्रारींचे निराकरण करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या पहिल्या माळ्यावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने काही तक्रारी असल्यास नागरिकांनी (०७२१) २६६१३६४ किंवा २६६२७८२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनी केले आहे.