दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी:-संतोष मनधरणे
देगलूर प्रतिनिधी:संभाजीनगर (औरंगाबाद) विभाग शिक्षक मतदार संघाचे भाजपा महायुती व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अधिकृत उमेदवार प्रा.श्री.किरण नारायणराव पाटील सर यांच्या प्रचारार्थ देगलूर तालुका नियोजन बैठक घेण्यात आले.
प्रा.श्री.किरण पाटील सर हे एक सक्षम पर्याय असून विधान परिषदेत मराठवाड्यातील शिक्षक बांधवांचे प्रश्न संवेदनशीलपणे मांडून न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील हा विश्वास व्यक्त केला.आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जास्तीत जास्त मते मिळविण्यासंबंधी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.त्यावेळी जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार श्री.प्रतापराव पाटील चिखलीकर,संयोजक मराठवाडा शिक्षक मतदार संघ श्री.मनोज जी पांगरकर, माजी आमदार श्री.सुभाष जी साबणे,जिल्हा सरचिटणीस लक्ष्मणराव ठक्करवाड,श्रावण पाटील भिलवंडे,शिवराज पाटील होटाळकर,डॉ.माधवराव पाटील उच्चेकर,शिवराज पाटील मालेगावकर,उत्तमराव कांबळे सर,अनिकेत पाटील, ॲड.रवींद्र पाटील,अनिल जी पाटील,शिवाजीराव कणकंटे,अशोक गंदपवार,संतोष पाटील,प्रशांत दासरवार तसेच तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी,सर्व मोर्चा पदाधिकारी व खूप मोठ्या संख्येने उपस्थित असलेले शिक्षक बांधव,कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.


