दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी:- संतोष मनधरणे
देगलूर: दिनांक 19/01/2023 वार गुरुवार रोजी ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूल च्या मैदानावर वार्षिक क्रीडा महोत्सवाला उत्सवात सुरुवात झाली. या महोत्सवासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय लक्ष्मण बेंलाळे (आंतरराष्ट्रीय कबड्डी पंच), त्याचबरोबर माननीय संदीप नवटक्के सर (चार्टर्ड अकाउंटंट), तुषार आवस्थी सर (राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार क्रीडा शिक्षक), मास्टर रवी कुमार शिंदे, संस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर सुजित बिरादार सर, व्यवस्थापक रामेश्वर सगरे, क्रीडा शिक्षक विठ्ठल गुरमे, विशाल कांबळे, महेश खरोचे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठा उत्साहात क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन करून व मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात करण्यात आली. या स्पर्धा पुढील सहा दिवस चालणार आहेत. शाळेचे सर्व विद्यार्थी वेगवेगळ्या सहा गटात विद्यार्थ्यां विभागून या क्रीडा स्पर्धा होणार आहेत. कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या वेळी मा. लक्ष्मण बेलाळे सरांनी शाळा शैक्षणिक पॅटर्न सोबत क्रीडा पॅटर्न पण रुजवण्याचे काम ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूल करत आहे व यातूनच सचिन तेंडुलकर, शुभम गिल, नीरज चोप्रा तयार होईल असे मत मांडले. तसेच संदीप नवटके सरांनी मुलांना स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. याचबरोबर अखिल भारतीय खेळ महासंघाद्वारे तुषार अवस्थी सरांना ऑल इंडिया डायमंड अवॉर्ड क्रीडा पुरस्कार मिळवल्याबद्दल ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूल यांच्या वतीने शाल श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन सुजीत बिरादार सरानी सत्कार करण्यात आला. त्यावेळी विद्यार्थ्यांनी कराटे, लाठी-काठीचे प्रात्यक्षिक करून उपस्थित पाहण्याचे मनी जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या विद्यार्थिनी प्रेरणा चिते व सावंत सृष्टी यांनी केली तर प्रस्तावना रामेश्वरी कदम मॅडम यांनी केली कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रामेश्वर सगरे सर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षिकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परीश्रम घेतले.


