
दैनिक चालु वार्ता सावरगाव सर्कल प्रतिनिधी -राम पाटील क्षीरसागर
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्ताने लोहा पंचायत समिती कृषी विभाग कार्यालय येथे बैठक पार पडली या बैठकीत शेतकरी प्रतिनिधी म्हणून सायाळ चे प्रगतशील शेतकरी रत्नाकर पाटील उपस्थित, राम पाटील क्षीरसागर होते त्यावेळी चोरमले यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना निकृष्ट आहार न खाता पारंपारिक तृणधान्य बाजरी राजगिरा राळा वरई नाचणी जवारी सावा ज्यामध्ये विविध प्रकारचे पौष्टिक घटक आहेत तोच आहार दररोजच्या जेवनामध्ये घ्यावा असे आव्हान केले त्यांनी ज्वारीपासून पोहे बनवता येतात याविषयीही उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले ज्वारीपासून लाह्या बनवता येतात प्रक्रिया उद्योगासाठी लागणाऱ्या मशनरी खूप स्वस्त आहेत आपण गाव पातळीवर जाऊन शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योगाची जनजागृती करून पारंपारिक पिके पेरण्यासाठी प्रोत्सावीत करावे गाव पातळीवर कृषी विस्तार अधिकारी यांनी कार्यक्रम घेऊन शेतकऱ्यांना तृणधान्या बद्दल माहिती द्यावी स्पर्धा लावाव्यात असे सांगितले आम्ही स्पर्धेच्या बैठकीचे नियोजनासाठी मार्गदर्शन करू असे त्यांनी बैठकीत सांगितले शेतकऱ्यांनी तृणधान्य पिकवावे आम्ही साखळी पद्धतीने पॅकिंग करून विकून देण्यास तयार आहोत असेही त्यांनी सांगितले त्यावेळी शेतकरी प्रतिनिधी म्हणून रत्नाकर पाटील यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले तुम्ही तृणधान्य खायला सुरुवात करा आम्ही शेतकरी शेतीमध्ये तृणधान्ये पिकवून तुम्हाला पुरवठा करू यावेळी शेतीमध्ये उत्कृष्ट नवनवीन प्रयोग केल्यामुळे शेतकरी प्रतिनिधी म्हणून रत्नाकर पाटील यांनी मार्गदर्शन केले यावेळी श्री. एस डी. चोरमले कक्ष अधिकारी, श्री. वाघमारे सर व श्री. पाठक सर दोघे कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्री. म्हेत्रे सर श्री. देशपांडे सर ,विस्तार अधिकारी पंचायत, श्री व्ही. व्ही कुलकर्णी विस्तार अधिकारी आरोग्य,श्रीमती एस टी सुतार श्री चोंडे विस्तार अधिकारी कृषी, तसेच इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या यावेळी व प्रास्ताविक सौ सुतार मॅडम यांनी केले