
दैनिक चालु वार्ता हिमायतनगर प्रतिनिधी: राम चिंतलवाड
शहरात कुठेही काही अनुचित प्रकार घडत असेल तर संपर्क साधा – पो. नि. बी.डी. भूषनूर
हिमायतनगर तालुक्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होत असताना त्यावर आळा घालण्यासाठी शहरातील व ग्रामीण भागातील महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी हिमायतनगर पोलिसांकडून एक विशेष मोहीम राबवली जात आहे. हिमायतनगर शहरात शाळा, कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींना जर का कुठला रोडरोमिओ,टवाळखोर याकडून त्रास होत असेल तर त्याची तक्रार आपल्या आई-वडिलांना कळवावी अन्यथा हिमायतनगर पोलीस प्रशासनाला कळवावे. त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. यासाठी ११२ या नंबर वर फोन करावा किंवा पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांना फोन करावा. असे आवाहन हिमायतनगर पोलिसांकडून करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर तालुक्यात व शहरात गेल्या अनेक दिवसापासून शाळा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलींना रोड रोमिओ हे त्रास देत असल्याचे समोर आले असून यापासून मुलींना सुरक्षा मिळण्यासाठी हिमायतनगर पोलीस मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत हिमायतनगर शहरातील शाळा, कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींना जर का कुठला रोड रोमिओ टवाळखोर कडून त्रास होत असेल तर त्यांनी आपल्या आई-वडिलांना कळवावे अन्यथा हिमायतनगर पोलीस प्रशासनाला कळवावे. तळखुरांच्या त्रासाला कंटाळून कित्येक मुलींची शाळा बंद झाली आहे कित्येक जरी मी मानसिक त्रास सहन केला व कितीकांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केलेला आहे. तसेच अनेक ठिकाणी काही मुलींनी आत्महत्या देखील केलेली आहे. हे सारे घडू नये यासाठी वेळीच त्यावर कठोर कारवाई च्या म्हणून अंमलबजावणी साठी पोलीस प्रशासक म्हणून आपल्या सेवेत २४ तास हजर आहोत. तुम्ही दिलेल्या माहितीची गोपनीयता लक्षात ठेवून संबंधितांवर संबंधितावर कठोरात कठोर कारवाई करू असे शहरातील मुलींना व महिलांनाही मात्र पोलीस प्रशासनाचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे. यासंबंधी कुठलीही तक्रार असल्यास पोलीस प्रशासनास आपत्कालीन नंबर ११२ वर संपर्क साधावा.
तसेच हिमायतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बी.डी.बुसनूर संपर्क क्रमांक-९८३४७७४७९९ , सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन संपर्क ९६८९७०७०३८, सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी संपर्क ९७६४१२३०१८,व महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक के.बी.कागणे मॅडम संपर्क क्रमांक ९९२१६२३३३३ या नंबर वर संपर्क साधून आपली तक्रार नोंदवावी असे आवाहन हिमायतनगर पोलीस दलाकडून करण्यात आले आहे.
या मोहिमेमुळे हिमायतनगर तालुक्यातील व शहरातील रोड रोमिओंच्या होणाऱ्या त्रासापासून मुलींना मुक्तता मिळण्यास नक्कीच सहकार्य होणार आहे. या उपक्रमाबाबत पोलीस प्रशासनाचे तालुक्यातील संबंध नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.