
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी :- संतोष मनधरणे
देगलूर ;देगलूर शहरातील लोकवस्तीत गुंडा महाराज मठ परिसर, जुना बसस्थानक, पिरोद्दीन टॉकीज, बुध्दविहार नविन बस स्थानक, फुलेनगर परीसर, देगांव नाका, रविदास चौक या सर्व लोकवस्तीच्या देगलूर शहर परिसरात उघड्यावर कोणत्याही वैद्यकीय अधिकाऱ्याच्या तपासणीविना प्राण्याचे कत्तल करून सदरील मांस, मटन, चिकन विकले जाते व उर्वरीत अवयव, रक्त नालीमध्ये, रोडवर मोकळ्या ठिकाणी टाकण्यात येते त्यामुळे त्याची दुर्गंधी पसरून नागरीक, महिला व वृध्द, विद्यार्थी यांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. तसेच वेळोवळी पाठपूरावा करून याची प्रशासनाने कुठलिही दखल घेतलेली नाही. अपातकालिन उघड्यावरील मांस विक्रीचे दुकान तात्काळ पर्यायी जागा उपलब्ध करून सर्व मांस विक्री दुकाने शहराच्या बाहेर करावेत यासाठीचे निवेदन दिगंबर रमेश कौरवार यांनी वेळोवळी निवेदनाव्दारे केली होती.
परंतु तरी देगलुर नगरपालिकेने कुठलिही कारवाई केली नव्हती. उघड्यावरील मांस विक्री मुळे अथवा अवैद्य कत्तलीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडल्यास आपण सर्वस्वी जबाबदार धरून आपल्या विरुध्द महाराष्ट्र नगरपरिषद व नगर पंचायती औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम (२६७ ते २६९) व महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा – १९७६ कलम ६ (२) तसेच घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम २०१६ अन्वये आपल्याविरुध्द कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात येईल व उघड्यावरील मांस विक्री दुकानातील मांस मनपा तर्फे जप्त करण्यात येईल अशी नोटीस दिनांक ०२/१२/२०२२ रोजी नगरपालिकेने काढली होती ती दुकाने अद्याप सुरू असल्यामुळे / चालू असल्यामुळे दिगंबर कौरवार, किरण उल्लेवार इतर १५ जणांच्या शहरातील वेगवेगळ्या भागातील रहिवाश्यांनी निवेदनावर स्वाक्षऱ्या केलेले निवेदन दिनांक ३० / १२ / २०२२ रोजी परत नगरपालिकेकडे उघड्यावरील मांस विक्रीचे दुकाने तात्काळ पर्यायी जागा उपलब्ध करून सर्व मांस विक्री दुकाने शहराच्या बाहेर करावेत नगरपालिकेने सर्वसाधारण सभा क्र. २५ दिनांक ३०/०५/२०१२ रोजी उघड्यावरील मांस विक्रीचे दुकाने बंद केली आहे तरीही अद्याप दुकाने चालू असल्यामुळे दिगंबर कौरवार यांनी अॅड. शिवानंद टेकवाड तमलुरकर यांचे मार्फत मा. उच्च न्यायालय खंडपिठ, औरंगाबाद मध्ये याचिका दाखल केली होती. सदरील याचिकेवर दिनांक २०/०१/२०२३ रोजी मा. उच्च न्यायालय खंडपिठ, औरंगाबाद यांचे मा. न्यायामुर्ती मंगेश पाटील, मा. न्यायमुर्ती एस. जी. चपळगावकर यांचे पिठासमोर सुनावणी होवुन देगलूर नगरपालिकेला दि. १७/०२/२०२३ पर्यंत उत्तर देण्यासाठी नोटीस बजावली आहेत. सदरील प्रकरणात अॅड. शिवानंद टेकवाड व अॅड. सेड्रीक फर्नांडीस यांनी बाजू मांडली. सरकारी पक्षातर्फे ए.एस.शिंदे यांनी बाजू मांडली.