
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
नांदेडः नवीन नांदेड सिडको हडको मधील सामाजिक कार्यकर्ते सामाजिक कामांमध्ये अग्रेसर राहणारे व शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते गौरव दरबस्तवार यांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे ,सह संपर्कप्रमुख भुजंग पाटील डक, महानगर प्रमुख पप्पू जाधव, नवीन नांदेड शहर प्रमुख जितू सिंह टाक सर्वांनी मिळून दरबस्तवार यांची उपशहर प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली या नियुक्तीचे सिडको हडको मधून नवयुकामध्ये उत्साह संचारला असून त्यांचे स्वागत मारुती पवळे, नारायण कुठे ,राजू चव्हाण, गजानन माणसपुरे ,पवन पंदीलवार, लक्ष्मीकांत कंधारकर यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत