
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- राम पाटील क्षीरसागर
लोहा तालुक्यातील आडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आडगाव येथे आनंदनगरी हा कार्यsक्रम आयोजित करण्यात आला यावेळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच गणेशराव क्षीरसागर व माजी सरपंच बालाजी पाटील क्षीरसागर यांच्या हस्ते आनंद नगरीचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक व आदी गावातील नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते यावेळी बालाजी पाटील क्षीरसागररसागर बोलताना म्हणाले शिका आणि विका यामधून आपल्याला बरच काही शिकता पण येईल मुलांनी मार्केटमध्ये व्यापारामध्ये कसं बोलून आपल्याला मार्केटमध्ये विकता येईल त्याची मार्केटिंग कशी करता येईल याबाबतीत माहिती होईल विद्यार्थ्यांनी असेच कार्यक्रम च्या माध्यमातून शिकता येणार आहेत यावेळेस बोलताना म्हणाले की शाळेने ज्या ज्या वेळेस असे कार्यक्रम आयोजित करतील त्या त्या वेळेस आम्ही निश्चितपणान शाळेतील कार्यक्रमाचे असेल व इतर कोणतेही कार्यक्रमास आवर्जून उपस्थिती असेल व जे काही लागेल त्यावेळेस आम्ही सहकार्य करू असं श्री बालाजी पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी जेष्ठ पत्रकार बालाजी धनसडे यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून आनंदनगरीच्या विद्यार्थ्यांनी आणलेल्या खाऊचा स्वाद घेतला व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी महावितरण चे मुकेश चव्हाण विठ्ठल होळगे , तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विश्वंभर पाटील क्षीरसागर ईश्वर वाले तुळसी राम पाटील क्षीरसागर अप्पाराव पाटील क्षीरसागर पुंडलिक पाटील क्षीरसागर व गावातील नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते