
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी लोहा- राम कऱ्हाळे
लोहा – श्री संत गाडगे महाराज प्राथमिक शाळा लोहा येथे आनंद नगरी साजरी करण्यात आली. यावेळी येथे चिमुकल्यांनी विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आले होते वडापाव सेंटर भेळ पाणीपुरी मसाला चिवडा कचोरी समोसा एकदम चविष्ट आणि छान प्रकारचे पदार्थ बनवून आनंदनगरी उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी श्री संत गाडगे महाराज प्रा.शा.लोहा मुख्याध्यापक श्री एस.आर. लुंगारे. श्री हांपल्ले एस. बी (स. शि.)श्री बसवंदे यु.बी.(स. शि )सौ पानपट्टे जे के (स शि) सौ पाटील जे बी (स. शि.) सौ.शेंडगे. एस.व्ही. यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली संत गाडगेबाबा प्राथमिक शाळाच्या वतीने आनंद नगरी कार्यक्रम बाल विद्यार्थीनी सुंदर प्रकारे साजरा केला .