
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
नांदेड :- नांदेड एज्युकेशन सोसायटीअंतर्गत चालणाऱ्या पीपल्स कॉलेज,चे प्रा.विलास नागनाथराव वडजे यांना एन.ई.एस.२०२२-२३ चा उत्कृष्ट क्रीडा शिक्षक पुरस्कार नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.व्यंकटेशजी काब्दे साहेब ,उपाध्यक्ष सीए डॉ.प्रवीण पाटील सर ,सचिव सौ.श्यामल पत्की मॕडम ,सहसचिव अॕड प्रफुल अग्रवाल सर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आला.या प्रसंगी , पीपल्स हायस्कुलचे शालेय समिती अध्यक्ष ,मा.नौवनिहालसिंग जहागिरदार ,सायन्स कॉलेजचे शालेय समिती अध्यक्ष मा.प्रदिप नागापूरकर , मा.श्री दीपनाथ पत्की ,पीपल्स कॉलेजचे प्राचार्य डॉ.आर.एम.जाधव ,सायन्स कॉलेजचे प्राचार्य श्री .डी.यु.गवई ,पीपल्स हायस्कुलचे मुख्याध्यापक श्री सेलमोकर , नांदेड एज्युकेशन सोसायटीचे इतर कार्यकारिणी सदस्य यांच्या उपस्थितीत सहकुंटूब सत्कार करण्यात आला.त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून अनेक मान्यवर मंडळींनी त्यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.