
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
–मुंबई-दै.मुंबई मित्र,दै.वृत्त मित्र वास्ट मिडीया व अभिजित राणे युथ फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात जनजागृती सेवा समिती,महाराष्ट्र या संस्थेला सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल”मुंबई अचिवर्स एक्सलन्स अवाॅर्ड २०२३प्राप्त झाला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा मुंबईच्या नरिमन पाॅईंट येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात दि.२४जानेवारी रोजी सायंकाळी उत्साहात पार पडला. हा अवाॅर्ड जनजागृती सेवा समितीचे संस्थापक-अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर व संस्थेचे पदाधिकारी महेश्वर तेटांबे यांना दै.मुंबई मित्र,दै. वृत्त मित्र,अभिजित युथ फाऊंडेशनचे संस्थापक विख्यात कामगार नेते अभिजित राणे यांच्या हस्ते व प्रमुख पाहुण्यांचा उपस्थितीत समारंभपुर्वक प्रदान करण्यात आला. “मुंबई अचिवर्स एक्सलन्स अवाॅर्ड २०२३”हा जनजागृती सेवा समितीला मिळाल्याबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.