
दैनिक चालु वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
पालघर/जव्हार: जव्हार तालुक्यातील लोकसंख्येच्या आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून कार्यरत असणाऱ्या ग्रुप ग्रामपंचायत कासटवाडी ग्रामपंचायतीची सन २०२२-२३ या आर्थिक वर्षातील २६ जानेवारीची नियोजित ग्रामसभा २४ जानेवारीला घेण्यात आली.या ग्रामसभेला ग्रामपंचायत हद्दीतील मतदारांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.राज्यात शिक्षक पदवीधर निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने धोरणात्मक निर्णय वगळून आचारसंहितेचे पालन करून ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच कल्पेश राऊत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या ग्रामसभेत नागरिकांच्या समस्या,कुपोषणासारख्या गंभीर विषयावर चर्चा करून उपाययोजना सुचवण्यात आल्या.
ग्रामीण भागातील आर्थिक स्त्रोत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून लोकांच्या हाताला काम उपलब्ध करून देण्याविषयीची चर्चा तसेच शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनार्थ केलेले अतिक्रमण,प्रधानमंत्री खनिज कर्म योजनेचा आराखडा या सारख्या जनतेच्या मूलभूत गरजांशी निगडित असलेल्या विषयावर चर्चा करण्यात आली.या ग्रामसभेला ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुलोचना चौधरी,ग्रामविकास अधिकारी किशोर सोनवणे,सदस्य बाळू भोये,त्रिंबक रावते,मोनिका खिरारी,कुणाल सापटा,नितीन टोकरे,नितीन चौधरी,राजश्री टोकरे,सुचिता होळकर,चंदा पवार,छाया भुसारा तसेच ग्रामपंचायत हद्दीतील जि.प शाळांचे शिक्षक,अंगणवाडी सेविका,आशा वर्कर,कृषी आणि वन विभागाचे कर्मचारी,ग्रामरोजगार सेवक या ग्रामसभेला उपस्थित होते.