
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) :- अंजनगाव सुर्जी येथून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या बोराळा रोडवर संगई जिनिंग जवळ गुरुवारी दिनांक १९ जानेवारी रोजी दुपारी बारा ते साडेबाराच्या दरम्यान निलेश अशोकराव डहाके वय ४३ रा.झाडपीपुरा सुर्जी हा फर्निचर चे काम करतो.तो कामावर जात असताना त्याच्यावर माकडांनी हल्ला केला त्या कळपातील एका माकडाने अक्षरशः त्याच्या डाव्या पायाच्या मांडीचे मास तोडले नवीन वर्षातील अंजनगाव सुर्जी मधील ही दुसरी घटना असून या अगोदर हर्षवर्धन सुरजलाल बगळे वय ३८ रा.कुंभारपुरा,तहसील रोड सुर्जी यांना सुद्धा माकडांनी इमारतीवरून पाडले असता त्यात त्यांच्या उजव्या पायाचा गुडघा अक्षरशः निकामी झाला.वारंवार होत असलेल्या माकडांच्या हल्ल्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून त्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.ह्या घटनांकडे वनपरिक्षेत्र विभाग दुर्लक्ष करीत असून वनविभाग यावर कुठली कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष आहे.