
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पुणे – संभाजी पुरीगोसावी
जिल्ह्यातील पारगाव तालुक्यामध्ये मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. यामध्ये कुटुंबातील मुलाने मुलगी पळून आणल्यांच्या रागाच्या भरात आई-वडिलांसह कुटुंबातील ७ जणांनी भीमा नदीत आत्महत्या केली आहे. प्रेम विवाहास कुटुंबाचा विरोध असल्यास अनेक तरुण-तरुणी पलायन करून आपला संसार थाटत असतात. अशा घटना चांगल्याच वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. यातील बरेच प्रकरणातील कुटुंब त्यांना स्वीकारते. तर काहीजण कायमचे संबंध संपवतात मात्र दौंड येथील घटनेने सर्वांच्या पायाखाली वाळू सरकली आहे. मुलाने मुलगी पळून नेल्याच्या रागाच्या भरात आई वडिलासह कुटुंबातील सात जणांनी आत्महत्या केली असल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. यामध्ये पती-पत्नी मुलगी आणि जावई यांच्यासह ३ मुलांचे मृतदेह भीमा नदीत आढळून आले आहेत. सर्व मृत कुटुंब बीड जिल्ह्यांतील गेवराई तालुक्यांचे रहिवासी: आणखीन मृतदेह सापडण्याची शक्यता पोलीस तपासामध्ये वर्तवण्यात आली आहे. पुढील पोलीस तपास सुरू आहे. घटनास्थळी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल व बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक आनंदराव भोईटे यांच्यासह दौंड,बारामती शहर बारामती,तालुका अशा पोलीस अधिकाऱ्यांची व पोलीस कर्मचाऱ्यांची घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे सर्वांचेच मन सुन्न झाले आहे. घटनेमुळे पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.