
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी:-संतोष मनधरणे
देगलूर:रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील यशस्वी उद्योजकांना “व्यवसाय सेवा पुरस्कार” देवून सन्मानित करण्यात आले. सैनिक स्कूल उदगीर चे कमांडर श्री. विजय सिंह, बँक ऑफ महाराष्ट्र चे श्री. अमित चंदन, साहित्यिक व चित्रपट निर्मार्त्या सौ. माहेश्वरी पाटील, युवा उद्योजक सौ. श्रद्धा सोनटक्के, श्री. सागर महाजन, श्री. मनोज सोलपुरे व श्री. उत्तम बिरादार यांना श्री. रमेशजी बिरादार यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
उदगीर शहरातील विविध शाळेतील दिनांक ८ जानेवरी २०२३ रोजी जवळपास ३००० विध्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. विजेता प्राप्त विध्यार्थ्यांना ४ सायकली, ४ टॅब ४ घड्याळ व २० ड्रॉइंग किट देवून रोटरी क्लब ऑफ उदगीरचे अध्यक्ष श्री. रामेश्वर निटुरे, आशिष अंबरखाने, व्यंकटराव कणसे व चंद्रकांत ममदापूरे, सुयश बिरादार आदी मान्यवर रोटरीचे सदस्य यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरीयन आशिष अंबरखाने यांनी केले तर अध्यक्षीय भाषणात रमेशजी बिरादार यांनी सर्वच विध्यार्थी डॉक्टर किंवा इंजिनियर होण्यापेक्षा विध्यार्थ्यातील जन्मजात कौशल्याना वाव देणे ही शाळेची व पालकांची संयुक्त जबाबदारी आहे. विद्यार्थ्यातील सुप्तगुण ओळखल्यास सचिन तेंडुलकर (भारतरत्न पुरस्कार), विराट कोहली, रोहित शर्मा, हे भारतीय क्रिकेट खेळाडू केवळ १२वी पास आहेत. भारताच्या गायिका कै. लता मंगेशकर यातर शाळेतच गेल्या नव्हत्या तरीपण ६ विद्यापीठाने डि.लिट पदवी देवून तर भारत सरकारने भारतरत्न पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. जगप्रसिद्द मोना लीसा यांचे चित्र आजरोजी रु. २०२ कोटीचे आहे. म्हणून पालकांनी चित्रकलेच्या स्पर्धेतून आपला विध्यार्थी आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रकार, उत्तम खेळाडू, गायक, नायक होऊ शकतो हे तपासून पाहणे किती महत्वाचे आहे तसेच अदययावत ज्ञान व सृजनशील विद्यार्थ्यांसाठी उपक्रमशील शिक्षणाबाबत सखोल मार्गदर्शन केले
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता हैबतपुरे व विशाल जैन यांनी केले तर रोटरीयन प्रा. व्यंकटराव कणसे यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले.