
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:माघ पाडव्याचे औचित्य साधून देगलूर उदगीर रोड येथील कलानगर भागात श्रीराम मंदीराचे भूमीपूजन करण्यात आले. त्यानिमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात शहर तालुक्यातील सर्व युवा व प्रमाणात व रामभक्तांसह, अबालवृध्द महिलांचाही मोठ्या सहभागी होते. या महाप्रसादाच्या कार्यक्रमास देगलुर- बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापुरकर यांच्यासह सर्वच पक्षाचे राजकीय पदाधिकान्यांसह, प्रतिष्ठित नागरिक व पत्रकार बांधवांनी उपस्थिती नोंदवली. रविवारी सकाळीवाजल्यापासून विविध कार्यक्रम घेत दुपारी १ ते ६ या वेळेत महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. हजारो रामभक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
शिंदे गट देगलूर तालुका प्रमुख घाळप्पा आबेसंगे शेळगावकर मंगनाळे, व्यंकट पुरमवार यादव उनग्रतवार, राजेश आऊलवार, सतिश नागमवार
श्रीनिवास पवार, बालाजी याटावार, गंगाधर बाशेटवार, एकनाथ टेकाळे, विश्वंभर कंतेवार, राजु बद्रीवार, सुधीर वट्टमवार, दिगंबर जाधव, राजु तेप्पावार, केसरे, औरादकर, रोहित जोशी, रमेश उनग्रतवार, संतोष जाधव, अमित पेंडकर, अप्पु सरसंबे, वरखिंडे, मोरे, वट्टमवार यांनी परिश्रम घेतले.