
दैनिक चालु वार्ता तालुका प्रतिनिधी –
भूम:-नगर परिषद मुख्याधिकारी, नगर अभियंता मुख्य लेखापाल यांनी केलेल्या बेकायदेशिर प्रकरणाची चौकशी करावी या मागणीसाठी भूम उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस आय, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना, ऑल इंडिया पँथर सेना आणि भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
अधिक माहिती की . भूम नगर पालिका अंतर्गत गेल्या अनेक वर्षात मुख्याधिकारी, नगर अभियंता, मुख्य लेखापाल यांनी बेकायदेशीरपणे काम केली आहेत . याची तात्काळ चौकशी करावी म्हणून वेळोवेळी मागणी केली . या संदर्भात वेळोवेळी भूम तहसिलदार, उपविभाग अधिकारी, जिल्हाधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे चौकशी करण्याची मागणी केली .
रस्ता कामाची वर्षाच्या आत दुरुस्ती करण्याची वेळ आली तरीही दुर्लक्ष आहे . श्री क्षेत्र देवस्थान येथे एक वेळेस तारेचे कंपाउंड केलेले असताना वर्षाच्या आत तेथेच पून्हा कंपाउंड वॉल करून कॉलमचे संरक्षण भिंत बांधून कंपाउंड केल आहे. म्हणजे या ठिकाणी कंपाउंडसाठी अल्पावधित शासनाच्या लाखो रुपयांचा खर्च केला आहे. शहराच्या अनेक भागात अनावश्यक ठिकाणी पेव्हर ब्लॉक रस्ते केले ते चारच महिन्यात रस्ते दुरुस्त केल्या नंतर पुन्हा आणखी तेच रस्ते दुरुस्त केले.
सौर ऊर्जेचे लाईट पोल अनावश्यक ठिकाणी बसवले . अनेक कामाची बेकायदेशीर टेंडर प्रक्रिया केली . माहिती अधिकारात माहिती मागितली तर मिळत नाहि वेळ काढूपणा केला आहे.
परिणामी नगर परिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक तानाजी चव्हाण , नगर अभियंता गणेश जगदाळे व मुख्य लेखाधिकारी याच्या मनमानी पणाची चौकशी करण्याची मागणी केली, परंतु मार्गी न लागल्याने कांग्रेस आय, राष्ट्रवादी कॉग्रेस, उध्दव ठाकरे शिवसेना, बाळासाहेबाची शिवसेना, ऑल इंडिया पॅथरसेना, भाजप अशा सर्व पक्षिय पदाधिकारी यांनी बुधवार दि २५ जानेवारी २०२३ पासून भूम उपाविभागीय कार्यालया समोर अमरण उपोषणास बसले आहेत .
उपोषणार्थीमध्ये कांग्रेस आय तालूका अध्यक्ष रुपेश शेडगे, जिल्हा उपाध्यक्ष विलास शाळू, रणजित वीर, कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती रमेश मस्कर , न्याय विभागाचे जिल्ह कार्याध्यक्ष गणेश साठे, आबा मस्कर , तालुका उपाध्यक्ष अमोल सुरवसे, भाजपचे तालुका सरचिरणीस संतोष सुपेकर , माजी नगरसेवक रोहन जाधव , शहर अध्यक्ष शंकर खामकर , अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष महेबूब शेख , शहर अध्यक्ष प्रदिप साठे, माजी नगराध्यक्ष संभाजी साठे यांचेसह असंख्य पदाधिकारी उपोषणास बसले आहेत .