
दैनिक चालु वार्ता म्हसळा – रायगड प्रतिनिधी – अंगद कांबळे
म्हसळा -गणेशनगर गावाच्या लौकिकात श्री गणरायाचे आगमन झाले पासुन अधिकच भर पडली असताना संपुर्ण ग्रामस्थांनी खासदार सुनिल तटकरे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विकास रथात बसण्याचा निर्णय घेतला आणि गावाच्या भौगोलिक विकासात अधिकच भर पडली आहे.पक्षाचे माध्यमातून आतापर्यंत गाव अंतर्गत रस्ते आणि श्री गणेश मंदीर सुशोभीकरण करण्यासाठी एकुण 40 लक्ष रुपयांची कामे मंजुर करण्यात आली आहेत.गणेशनगर गाव अध्यक्ष गोविंद कांबळे,पाचगाव आगरी समाज अध्यक्ष भालचंद्र गाणेकर यांनी गावाचे विकासासाठी अधिकची मागणी केली असता गणेशनगर गावाच्या विकासासाठी दिलेल्या शब्दाची पूर्तता करणार असल्याचे आमदार आदिती तटकरे यांनी माघी श्री गणेशोत्सव स्वागत कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना सांगीतले.या वेळी त्यांचे समावेत जिल्हा चिटणीस महादेव पाटील,तालुका अध्यक्ष समीर बनकर,महीला अध्यक्षा सोनल घोले,माजी सभापती छाया म्हात्रे,उपसरपंच गौऱ्या गाणेकर,मधुकर गायकर,संदीप चाचले,नगरसेविका सरोज म्हाशीलकर,मीना टिंगरे,माजी सरपंच अनंत कांबळे,महेश घोले,लहू म्हात्रे, अनिल टिंगरे,मुंबई अध्यक्ष किसन कांबळे,हरिश्चंद्र नाक्ती,रघुनाथ नाक्ती,एकनाथ गानेकर,उदेश म्हात्रे,महीला अध्यक्षा भारती गाणेकर,दर्शना गाणेकर,रसिका कांबळे,गीता गाणेकर आदी मान्यवर ग्रामस्थ महीला मंडळ उपस्थित होते.आमदार आदिती तटकरे यांनी म्हसळा तालुक्यातील आयोजीत माघी गणेशोत्सवाल मेंदडी,मेंदडी कोडं,तुरुंबाडी,रोहिणी,आडी ठाकुर या गावातील गणेश मंदिरात जाऊन मनोभावे दर्शन घेतले. त्यांनी उस्तव कार्यक्रमांत ग्रामस्थ गणेश भक्तांना आरोग्यदायी,सुख समृद्धी मिळण्यासाठी श्री गणरायाचे चरणी प्रार्थना करून शुभेच्छा दिल्या.