
दैनिक चालु वार्ता म्हसळा – रायगड प्रतिनिधी – अंगद कांबळे
म्हसळा – देशात २५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणुन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी रायगड अलिबाग व उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली अंजुमन हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज म्हसळा येथे रॅली काढून प्रसार करण्यात आले.कार्यक्रमासाठी तहसीलदार समीर घारे,नायब तहसीलदार गणेश तेलंगे, महसूल नायब तहसीलदार डी.जे.पाटील,प्राचार्य तांबेसर,प्राचार्य मोरेसर,न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक,शिक्षिका वंदना खोत,कल्पना पाटील,तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी,विद्यार्थी,विद्यार्थिनीनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता.कन्या शाळेच्या प्रांगणात सर्वांनी मतदान करणे बाबत सामुहिक शपथ घेऊन रॅलीची सांगता करण्यात आली.रॅली कार्यक्रमांत वसंतराव नाईक कॉलेजच्या विद्यार्थी,विद्यार्थिनींनी मतदार नोंदणीचे आव्हान करणारे पथनाट्य सादर केले.