
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड- गोविंद पवार
लोहा येथील जेष्ठ व प्रतिष्ठित नागरिक कै. सुभाष सावकार सुर्यवंशी यांच्या पुण्य स्मरणार्थ व ओंकारेश्वर मंदिराच्या ६ व्या वर्धापनदिनानिमित्त शिवकल्याण नगर येथील ओंकारेश्वर मंदिरात नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या वतीने रूद्रा अभिषेक व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी लोहा शहर व परिसरात हजारो भाविक भक्तांनी यांचा लाभ घेतला.ओमकारेश्र्वर माहादेव मंदिराच्या 6 वर्धापन दिनानिमित्त कै सुभाषराव विश्वनाथराव सुर्यवंशी यांच्या स्मरणार्थ रुद्र अभिषेक लक्षीमीकांत सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आला व माहाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी शिवकल्याण नगर मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राम सावकार सुर्यवंशी गंगाधर सावकार सुर्यवंशी शंकर होनराव तानाजी मचेवार गुलाबराव मोटे ययाती घोरबाड भातलवंडे सर गणेश कोंम्पलवार शिवकल्याण नगर मधील सर्व महिला पुरुष मंडळींनी परीश्रम घेतले व लोकनियुक्त नगरअध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी यांना मंदिर समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले व त्यांच्या मागण्या लगेचच मान्य करण्यात आल्या.मंदिर समितीच्या वतीने लोकनियुक्त नगरअध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी यांचा भव्य सत्कार करण्यात आला.