
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
२६ जानेवारी रोजी ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जय महाराष्ट्र प्राथमिक शाळा लोहा येथे माजी नगराध्यक्षा तथा शालेय समिती अध्यक्षा सौ.आशाताई रोहिदासरावजी चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.तसेच लोहा शहरात शिवसेना युवा सेनेच्या वतीने खाऊचे वाटपही करण्यात आले. प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे सौ.आशाताई रोहिदासरावजी चव्हाण यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यात मुलींचे लेझीम पथक, ढोल ताशे, आकर्षक असे नृत्य सादर करत भव्य प्रभातफेरी तहसील कार्यालय लोहा येथे दाखल झाली.लेझिम पथकातील वेशभूषा व आकर्षक नृत्याने उपस्थितांची मने जिंकली.अगदी कमी कालावधीमध्ये मुलांचा सराव घेऊन तयार करण्यात आलेल्या लेझीम पथक हे प्रभात फेरीतील विशेष आकर्षण ठरले. भारतमातेच्या वेशभूषेतील विद्यार्थिनी कु.वैष्णवी लुंगारे हिने आजच्या प्रभातफेरीत उपस्थितांची मने जिंकली. लोहा तहसीलदार व्यंकटेश मुंडे,मुख्याधिकारी गंगाधर पेंटे, गटविकास अधिकारी शैलेश वाव्हळे,नायब तहसीलदार राम बोरगांवकर,नायब तहसीलदार अशोक मोकले यांसह इतर अधिकारी,कर्मचारी यांना शालेय विद्यार्थ्यांसोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही.तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी लेझिम पथकातील विद्यार्थिनींचे कौतुक केले,शुभेच्छा दिल्या.यावेळी जय महाराष्ट्र प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संतोष भालेराव, सहशिक्षक नारायण वाघमारे, माधव कवठेकर, पुरी, कुलकर्णी, राठोड,पारेकर, सौ.क्षीरसागर मॅडम सौ.चौले मॅडम आदी उपस्थित होते.
लोहा तहसील कार्यालयाच्या समोर कंधार
रोडवर युवासेनेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी शिवसेना युवा नेते तथा जिल्हा नियोजन समिति सदस्य तथा पं.स.सदस्य तथा सिनेट सदस्य
नवनाथ (बापू) रोहिदास चव्हाण यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.यावेळी युवा सेना उपजिल्हा प्रमुख कैलास कहाळेकर, शहरप्रमुख महेश पाटील चव्हाण, उपशहरप्रमुख अशोक केंद्रे,सतीश पा सूर्यवंशी,कल्याण पा जामगे,प्रताप पा वाकडे,शिव पा काकडे,सुनिल पा जामगे,प्रल्हाद पा जामगे, व्यंकटेश वाघमारे,तिरुपती पा कदम,सचिन पा सूर्यवंशी, अशोक ससाणे सह युवा सेना पदाधिकारी उपस्थित होते.