
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा /सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा.. तालुक्यातील अंभोडा (कदम)येथील जि.प.प्रा. शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच ग्रामपंचायत तर्फे गावातील सर्व १०१ विधवा व निराधार महिलांना ग्रामपंचायत तर्फे साड्या वाटप करण्यात आल्या.
या कार्यक्रमाला गावातील सर्व सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य व स्तरातील नागरिक उपस्थित होते. यावेळी रमेश चव्हाण, सुभाष चव्हाण व कृष्णानंद महाराज यांच्या हस्ते १०१ महिलांना साड्यांची वाटप करण्यात आली
प्रजासत्ताक दिनाची औचित्य साधून आंबोडा कदम ग्रामपंचायत ने गावातील १०१ विध्व व निराधार महिलांना साड्या वाटप केल्या. यावेळी सरपंच बबन सरवदे, उपसरपंच अविनाश चव्हाण सदस्य श्रीमती उषा चव्हाण गुंफाबाई राठोड सविता राठोड रमेश चव्हाण सुभाष राठोड राम चव्हाण रोहिदास राठोड राहुल ढाकरके सुलोचना बोराडे शारदा बोराडे उषा चोरमारे ज्योती चव्हाण अहिल्याबाई नवले आदींची उपस्थिती होती.
प्रजासत्ताक दिनाची औचित्य साधून १०१ विधवा व निराधार महिलांना ग्रामपंचायत तर्फे साड्या वाटप करण्यात आल्या या सुसस्त उपक्रमाबद्दल अंभोडा कदम ग्रामपंचायतचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.