
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा /सुरेश ज्ञा. दवणे..
भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील विद्यार्थ्यांशी आज संवाद साधला परीक्षा पे चर्चा या उपक्रमाअंतर्गत परतुर तालुक्यात ही हा उपक्रम राबविण्यात आला यामध्ये परतूर येथील नवोदय विद्यालयांमध्ये माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीमध्ये परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम संपन्न झाला
यावेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते परीक्षा पे चर्चा विषयांतर्गत घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेमधील प्रथम द्वितीय तृतीय आलेल्या विजेत्यांना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र रोख बक्षीस देण्यात आले
सकाळी 11 वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील विद्यार्थ्यांशी संवाद या ठिकाणी उपस्थित विद्यार्थी पालक आणि आमदार बबनराव लोणीकर यांनी मंत्रमुग्ध होऊन ऐकला
दरम्यान विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे देताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उत्तरावर प्रचंड टाळ्यांचा कडकडाट सभागृहामध्ये होताना दिसला
या कार्यक्रमानंतर चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करतेवेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की परीक्षाची धास्ती घेऊन अनेक विद्यार्थी आत्महत्या करत असतात मानसिक दडपणाखाली असतात त्यामुळे आज मोदीजींनी विद्यार्थ्यांसाठी तणाव मुक्तीचा दिलेला संदेश हा अतिशय महत्त्वाचा असून यामुळे विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा निर्मिती होऊन विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाताना मुक्त होऊन जातील असा आशावाद यावेळी त्यांनी व्यक्त केला पुढे ते म्हणाले की विद्यार्थी दशेमध्ये विद्यार्थ्यांना अनेक छोट्या मोठ्या बाबींचे टेन्शन येत असते मात्र मोदीजींनी अतिशय सजगपणे विद्यार्थ्यांना या तणावापासून कसे मुक्त व्हावे या संदर्भात दिलेला विचार मौलिक असून तो विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले, दरम्यान परतूर मंठा विधानसभा मतदारसंघांमधील परतुर मंठा नेर शेवली भागातील अनेक शाळांमध्ये हा कार्यक्रम थेट प्रक्षेपित करण्यात आला
यावेळी चित्रकला स्पर्धेमध्ये नवोदय विद्यालय आंबा येथील विद्यार्थी ओम बावणे प्रथम रोख रक्कम 1000 रु व प्रमाणपत्र, कुमारी अस्मिता द्वितीय रोख रक्कम 500 रु व प्रमाणपत्र, तृतीयालीला विद्यार्थी साईराज कांयंदे रोख रक्कम 500 रु व प्रमाणपत्र आमदार लोणीकर यांनी प्रायोजित केलेले बक्षीस वितरित करण्यात आले
तर जि प प्रशाला सातोना येथील विद्यार्थी ऋतुजा राजाराम आकात पुनम मारुती चौरे युज गणेश परभणीकर यांना प्रथम द्वितीय तृतीय असे रोख रक्कम 1000 व 500 तसेच प्रमाणपत्र वितरित करण्यात आले हे बक्षीस विलासराव आकात 2000 सय्यद अली 2000 विकास खरात 500 दिगंबर आकात 500 यांच्याकडून देण्यात आले होते
तर योगानंद माध्यमिक विद्यालय परतुर येथील विद्यार्थी रामेश्वर दगडोबा तरासे श्रद्धा सतीश राव सुरवसे वैष्णवी भानुदास देवक यांना अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय रोख पारितोषिक 1000 व 500 रुपये तसेच प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले हे बक्षीस नगरसेवक प्रकाश चव्हाण मनोहरराव खालापूरे, मनोहरराव पेडगावकर यांच्या वतीने जाहीर करण्यात आले होते
जिल्हा परिषद प्रशाला नूतन आष्टी उर्दू माध्यम येथील विद्यार्थी अर्जिन निसार कुरेशी बरेखानी महेर अब्दुल वाहेद, मिसबा अब्दुल खदिर कुरेशी, या विद्यार्थ्यांना अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय रोग पारितोषिक व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले हे बक्षीस मोहम्मद भाई जमीनदार बब्बू शेठ यांच्यावतीने जाहीर करण्यात आली होती तर ब्राह्मण वाडी येथील विद्यार्थिनी कुमारी नंदिनी श्याम सोळंके अर्चना अरुण भले शिवम एकनाथ डुकरे या विद्यार्थ्यांना अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय पारितोषिक वितरित करण्यात आले हे बक्षीस हे बक्षीस श्रीराम सोळंके शत्रुघ्न कणसे कृष्णा भदर्गे यांच्या वतीने जाहीर करण्यात आले होते जि प प्रशाला परतूर येथील विद्यार्थी पायल शिवनारायण हरकळ, मस्जिद खलील देशमुख विद्या शिवाजी मुजमुले, अमृता प्रल्हाद धुरट यांना अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय पारितोषिक रोख हजार व 500 प्रमाणे वितरित करण्यात आले हे बक्षीस नगरसेवक संदीप बाहेकर नगरसेवक सुधाकर सातोणकर नगरसेवक प्रकाश चव्हाण लक्ष्मण बापू पवार यांच्या वतीने जाहीर करण्यात आले होते जि प कन्या शाळा आष्टी येथील विद्यार्थिनी कुमारी दिव्या कैलास खाडे श्रद्धा साहेबराव खाडे आरती रामा काळे यांना अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय पारितोषिक वितरित करण्यात आले हे बक्षीस बाबाराव थोरात अमोल जोशी यांच्या वतीने जाहीर करण्यात आले होते
जि प प्रशाला आष्टी येथील कुमारी राजश्री बाळू कोपते, दीक्षा विठ्ठल जाधव अक्षरा गोरख बहिरे यास्मिन सलीम कुरेशी यांना अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय रोख पारितोषिक व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले हे बक्षीस पंचायत समितीचे उपसभापती रामप्रसाद थोरात आष्टीचे सरपंच मधुकरराव मोरे जि प सदस्य सुदाम प्रधान यांच्या वतीने जाहीर करण्यात आले होते
आंबा येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय ची विद्यार्थिनी कुमारी गीता दिगंबर मुळे माया संतोष पहाडे कल्याणी अर्जुन राकुसले संगीता ज्ञानदेव सोनवणे यांना अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय रोख पारितोषिक व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले हे बक्षीस आंबा येथील सरपंच मिराज खतीब कैलास बोनगे कृष्णा भदरगे यांच्या वतीने जाहीर करण्यात आले होते
सोमेश्वर विद्यालय श्रीष्टी येथील विद्यार्थी कुमारी आकांक्षा रोहिदास गायकवाड मयुरी महादेव अंभोरे कृष्णा छत्रभूज अंभोरे यांना अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय पारितोषिक व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले हे बक्षीस उपसभापती रामप्रसाद थोरात लताताई थोरात सृष्टी येथील सरपंच किरण अंभोरे यांच्या वतीने जाहीर करण्यात आले होते
श्री समर्थ माध्यमिक विद्यालय पाटोदा येथील विद्यार्थी शेख सानिया नबी, प्रतिक्षा शाम गायकवाड करण कल्याणराव बोराडे या विद्यार्थ्यांना अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय हजार व पाचशे प्रत्येकी रोग बक्षीस व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले हे बक्षीस माजी मंत्री विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांच्या वतीने जाहीर करण्यात आले होते
शंभू महादेव विद्यामंदिर वाटुर फाटा येथील विद्यार्थिनी कुमारी पुनम विष्णू मंडपे पल्लवी अविनाश चव्हाण रिशिका दिलीप वायाळ यांना अनुक्रमे प्रथम द्वितीय व द्वितीय बक्षिसाचे वितरण करण्यात आले हे बक्षीस गट समन्वयक कल्याण बागल विस्तार अधिकारी संतोष साबळे यांच्यावतीने जाहीर करण्यात आले होते
परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने परतुर तालुक्यासह मतदारसंघातील विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धा तसेच प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांचे संबोधन याला प्रचंड असा प्रतिसाद दिला
यावेळी नवोदय विद्यालयाची प्राचार्य शैलेश नागदेवते गटशिक्षणाधिकारी कुलधर विविध शाळा महाविद्यालयातील शिक्षकांची उपस्थिती यावेळी होती