
दैनिक चालु वार्ता,इंदापूर प्रतिनिधी -बापु बोराटे
पुणे/इंदापूर: तालुका काँग्रेसच्या वतीने आज मोदी सरकारच्या प्रचंड दबावात धनदांडग्या, संघटित टेक्सटाईल गारमेंट आणि खाद्य तेल उत्पादक लाॅबीच्या फायद्यासाठी सेबीने कापसासह, सोयाबीन, तांदूळ, गहू ,हरभरा, मोहरी व तूरडाळ उत्पादनाच्या सौद्यावर वायदे बाजारात बंदी घातली, त्यामुळे शेतीमालाच्या मोठ्या प्रमाणात किंमती घसरल्या .मुळातच शेतीमालाच्या वायद्यावर बंदी घालणे ही कृती सेबीच्या मुख्य उद्देशाला छेद देणारी आहे. सीबीने वायदे बाजाराचे संवर्धन व गुंतवणूकदारांचे संरक्षण करण्यासाठी नियम करावे मात्र बंदी घालू नये या वर्षाच्या हंगामात कापसासह, तेलबिया व डाळ वर्गीय पिकांना भरपूर भाव मिळेल अशी अपेक्षा होती परंतु वायदे बाजारातील बंदीमुळे शेतमालाच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली याचा फटका शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात बसला आहे.
याच भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध आज इंदापूर तालुका काँग्रेसच्या वतीने आंदोलन करून नायब तहसीलदार अनिल ठोंबरे यांना निवेदन देऊन आम्हा शेतकऱ्यांचे म्हणणे आपण सरकारपर्यंत पोहोचवून आम्हाला न्याय मिळवून द्यावा असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी इंदापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आबासाहेब निंबाळकर, तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष तानाजी भोंग, अल्पसंख्याक इंदापूर तालुका अध्यक्ष नाशीरभाई शेख, ओबीसी सेल इंदापूर तालुका अध्यक्ष बापूसाहेब बोराटे, इंदापूर तालुका काँग्रेस सरचिटणीस संतोष शेंडे, इंदापूर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद साबळे, इंदापूर तालुका युवक काँग्रेस उपाध्यक्ष अरूण राऊत, अनुसूचित जाती जमाती सेलचे अध्यक्ष युवराज गायकवाड यांच्या सह इतर पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.