
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -प्रदिप मडावी
चंद्रपूर
चंद्रपूर: बाबुपेठ येथील विकतु बाबा मंदिर जवळील माहेर घर परिसर येथे महानगर पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे चुकीच्या पद्धतीने नाली चे अर्धवट काम केल्याने वाहत आलेले संडास बाथरूम चे सांड पाणी हे तेथील नागरिकांच्या घरात जात असून संपूर्ण परिसरात ही घान पसरून आजूबाजूच्या लोकांना रोगराई ने समोर जावे लागत होते.
तात्कालीन नगर सेवक यांना वारंवार तक्रार करून सुध्दा ते या कडे दुर्लक्ष करत असल्याने तेथील जनतेनी आप चे शहर सचिव तथा मनपा सह प्रभारी राजु भाऊ कुडे यांच्या कडे याबाबत तक्रार केली .
त्यानंतर राजु कुडे यांनी आपल्या कार्यकर्ते पदाधिकारी यांना सोबत घेऊन जागेची पाहणी केली असता अनेक नागरिकांनी मलेरीया, डेंग्यू सारखे आजार या साचलेल्या अर्धवट नाल्याचा पाण्यामुळे झाल्याचे सांगितले. जाणीवपूर्वक नाल्याचे अर्धवट काम करून जनतेचा जीव धोक्यात टाकण्यात आला आहे, ही गंभीर बाब असून संबधित दोषी अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर फौजदारी कारवाई करून अर्धवट नाल्याचे बांधकाम तात्काळ पूर्ण करण्याचे आव्हान आप चे शहर सचिव राजु भाऊ कूडे यांचा कडून मनपाला करण्यात आले होते. त्यानंतर या कामाला मंजुरी मिळून सदर नाल्याचे काम पूर्ण झाले.
याकरिता तेथील जनतेने राजु भाऊ कुडे आणि आप चंद्रपुर चे कार्यकर्ते पदाधिकारी यांचा मोलाचा सहभाग लाभला करिता आभार मानले