
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:- तालुक्यातील आष्टा येथील आरोग्य उपकेंद्र सतत बंद असल्याची तक्रार ग्रामस्थांनी दि २६ जानेवारी रोजी केली होती.याची तात्काळ दाखल घेत दि २९ जानेवारी वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश सोनवणे (माणकेश्वर) यांनी आष्टा येथील आरोग्य उपकेंद्र येथे भेट दिली. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ अजित जाधव यांच्याकडे (OPD) आरोग्य उपकेंद्र चालू असल्याचे रेकॉर्ड उपलब्ध नसल्याचे आढळून आले. शासन निर्णय प्रमाणे समुदाय आरोग्य अधिकारी हे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र यांचे अधिनस्त काम करतील. समुदाय आरोग्य अधिकारी यांना प्रामुख्याने खालील सेवा देणे बंधनकारक आहे.समुदाय आरोग्य अधिकारी यांचे दैनंदिन कामकाज वेळापत्रक खालील प्रमाणे राहील.सकाळी ०८.३० ते १२.३० – ओपिडी सोमवार ते शुक्रवार दुपारी ०१.३० ते ५.०० फिरती ०५.०० ते ५.३०- दिवसभरात केलेल्या कामाचे Record Portal वर अपडेट करणे.२) सकाळी ०८.३० ते १२.३० ओपिडी शनिवार ३) रविवार सुटी ४) रविवारला जोडून किंवा सलग दोन दिवस सार्वजनिक सुट्टी आल्यास दोन्ही पैकी १ दिवस फक्त ओपिडी ०८.३० से १२.३० पर्यंत चालू राहिल.५) सार्वजनिक सुट्यांना ओपिडी फिरती बंद राहील.अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश सोनवणे (माणकेश्वर) यांनी देऊन समज आरोग्य अधिकारी डॉ अजित जाधव यांना देण्यात आली.यावेळी आरोग्य अधिकारी यांची लेखी घेउन यापुढे शासनाच्या नियमाच्या अधीन राहून OPD चालू राहील याची ग्वाही ग्रामस्थांना दिली.यावेळी कायमस्वरूपी आरोग्य सेविका चे पद भरण्याची ग्रामस्थांनीं मागणी केली आहे.कंत्राटी कर्मचारी आरोग्य सेविका शेख AR यांच्याकडे कार्यक्षेत्र मोठे असून आष्टा,आष्टा वाडी, गोलेगाव, वांगी बु,वांगी खू ते गरोदर महिला व बालकांसाठी आवश्यक असलेल्या एमसीटीएस (मदर अॅण्ड चाईल्ड ट्रॅकिंग सिस्टम) याची नोंद असल्याचे रेकॉर्ड दिसून आले असे वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश सोनवणे यांनी ग्रामस्थांना सांगितले.आरोग्य कर्मचाऱ्यांना उपकेंद्रामध्ये असुविधा भेडसावत असलेल्या सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावेत अशी मागणी ग्रामस्थ यांनी केली आहे.