
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी पुरीगोसावी
पुणे ग्रामीण पोलीस विभागांमध्ये वेल्हे पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये एकच ठिकाणी आरोपींकडून मोठ्या रकमेचा खजिना हस्तगत करण्यांची ही पहिलीच घटना आहे… दोन कोटी रुपयांच्या सोन्या-चांदीच्या खजिन्यासाठी विजय प्रफुल्ल काळोखे (वय ३८रा. कन्या शाळेजवळ विजय लॉज बोर्डिंग आप्पा बळवंत चौक पुणे) यांची आंबी ( ता.हवेली ) येथील आरोपींनी पुण्यांतील कात्रज येथील संतोषनगर येथे निर्घृण हत्या केल्यांचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी आरोपींकडून तब्बल १ कोटी ८३ लाख रुपयाच्या सोन्या-चांदीचे दागिने, खजिन्यासह मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. यामध्ये चार आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. याप्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार अधिक तपास करीत आहेत. सदरची कामगिरी पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल,अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार व पोलीस उपनिरीक्षक महेश कदम, सहाय्यक फौजदार सुदाम बांदल,योगेश जाधव, हवा. रवींद्र नागटिळक, अजयकुमार शिंदे, कांतीलाल कोळपे, आकाश पाटील यांच्या पथकांने आरोपीकडूंन मोठ्या रकमेचा खजिना हस्तगत करण्यासाठी सखोल तपास केला. त्यांच्या या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांकडून कौतुक