
दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी – शिवकुमार बिरादार
मुखेड :
नाभिक महामंडळाचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख दत्ता चापलकर यांच्या उपस्थितीत नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष संजय मोगलपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली मुखेड येथे दिनांक 20 जानेवारी रोजी मुखेड येथे हनुमंतराव श्रीमंगले व नामदेव चापलकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाभिक महामंडळाच्या अध्यक्षपदी प्राध्यापक पत्रकार नामदेव श्रीमंगले तर सचिवपदी महेश बेळीकर, उपाध्यक्ष केशव गायकवाड, कोषाध्यक्ष रमेश चापलकर, कार्याध्यक्ष श्रीनिवास हळदेेकर सहसचिवपदी सहसचिव धर्मराज कोतवाले यांची निवड करण्यात आली. या निवडीसाठी नामदेव चापलकर, सुरेश कोतवाले, दिवाकर हलदेकर, शिवाजी कोतवाले, धोंडीबा कोतवाले, राजू बेळीकर, उत्तम श्रीमंगले, व्यंकट श्रीमंगले, हरी चापुलकर, धर्मा कोतवाले, ज्ञानेश्वर कोंडामगले व नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.