
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे.. मंठा..ग्रामीण भागातील प्रत्येक गावच्या विकासाचा कणा समजले जाणारे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी महत्त्वाचे घटक आहेत. या घटकाला कार्यक्षम व कार्यान्वित करण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये रोजच कार्यालयीन वेळेत उपस्थितीसाठी आता ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू करण्यासाठी ग्रामविकास विभागाने नुकताच निर्णय घेतला आहे. याबाबतचे पत्र विभागीय आयुक्तांना पाडले आहे. जिल्हा परिषदांकडून..तत्काळ कार्यवाही करून घेण्यात यावी, केलेल्या कार्याव शासनास सादर करावा अशा सूचना या पत्रात दिल्या आहेत. यामुळे गावातील नागरिकांच्या समस्या आता वेगाने सुटणार आहेत.
ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकान्यांना लागू होणारी बायोमेट्रिक हजेरी प्रणाली ही गावच्या विकासासाठी वरदान ठरणारी असून, गावचा खऱ्या अर्थाने विकास साधायचा असेल, तर या कर्मचान्यांना बायोमेट्रिक हजेरी प्रणाली सुरू करण्याची गरज निर्माण झाली. होती. अखेर शासनाकडून विभागीयआयुक्तांना याबाबत पत्र पाठवण्यात आल्याने जाता ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकान्यांना बायोमेट्रिक प्रणालीला सामोरे जावे लागणार आहे.
राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना वेळेचे बंधन राहावे. तसेच, कर्मचाऱ्यांनी वेळेत उपस्थित राहून आपली जबाबदारी चोख पार पाडावी, असे असताना काही गावात ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आपल्याला दिलेल्या वेळेवर हजर राहत नसल्याने नागरिकांच्या समस्या सुटत नव्हत्या, अशा अनेक तक्रारी यापूर्वीशासनाकडे दाखल झाल्या आहेत.
महाराष्ट्र शासनाने गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासनात सुबत्ता आणण्यासाठी शासनाच्या सर्वच विभागात बायोमेट्रिक हजेरी कार्यान्वित केली आहे. ज्या शासकीय कार्यालयात बायोमेट्रिक हजेरीचा उपयोग केला, अशा कार्यालयात कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहिल्याने नागरिकांच्या समस्या सोडवण्यात यश आले आहे. मात्र, या कार्यालयामध्ये बायोमेट्रिक हजेरी नाही, अशा कार्यालयात कर्मचाऱ्यांवर कुणाचा अंकुश नसल्याने येथील विकास रखडला आहे..ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक कार्यालयीन वेळेत कधीच उपस्थित राहत नाहीत, तर कित्येक गावांमध्ये हे कर्मचारी ५ ते ७. दिवसानंतर एखाया वेळेस काही कालावधीसाठी हजर राहतात.
बायोमेट्रिक हजेरी ही आजच्या टेक्निकलयुगात सहज शक्य आहे. अतिशय दुर्गम भागात नेटवर्क पोहचलेले आहे. त्यामुळे ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन कामे अधिक गतीने करणे सोईचे झाले. परंतु, बहुतांश नागरिकांच्या तक्रारी आहेत की, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक गावपातळीवर हजर राहत नसल्याने ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र, आता शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी लागू होणार असल्याने नागरिकांच्या समस्या सुटणार असून, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, पशुधन दवाखान्यातील कर्मचारी कार्यालयीन वेळेत हजर राहत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांनाही बायोमेट्रिक हजेरी लागू करावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.