
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
पुणे: इंदापूर तालुक्याच्या राजकीय पटलावर नवतरुण कब्जा करू पहात आहेत. प्रस्थापित राजकारण्यांच्या विरोधात दंड थोपटत ‘तरुणाई’ त्यांना आव्हान देऊ पहात आहे. तालुक्याच्या राजकारणात शिरू पाहणारे मोजकेच तरुण कार्यकर्ते समाजकारणाच्या माध्यमातून सक्रीय आहेत. त्यापैकीच एक असणारे आणि अत्यल्प कालावधीत आपली स्वतःची आगळीवेगळी ओळख निर्माण करणारे युवा नेते बापूसाहेब बोराटे. बापू हा युवा कार्यकर्ता. जेमतेम 30 वर्षे वयाचा उमदा तरुण. अखिल भारतीय कॉंग्रेसच्या इंदापूर तालुका ओबीसी सेल अध्यक्ष पदाची धुरा आपल्या खांद्यावर पेलवत सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात झपाटून काम करत आहे. केवळ तीन – चार वर्षांच्या सामजिक जीवनात युवा कार्यकर्ता ते युवा नेता असा चकित करणारा प्रवास करणाऱ्या बापूसाहेब बोराटे यांचा ३० जानेवारी रोजी वाढदिवस आहे.
बापू बाळासाहेब बोराटे यांचा जन्म शेटफळ हवेली या छोट्याशा खेड्यात झाला.त्यांचे प्राथमिक शिक्षण शेटफळ हवेली गावी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे झाले.माध्यमिक शिक्षण माध्यमिक विद्यालय शेटफळ हवेली येथेच झाले, आणि उच्च माध्यमिक शिक्षण त्यांनी श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बावडा येथे पूर्ण केले. कौटुंबिक परिस्थिती म्हणाल, तर अगदी जेमतेम. मात्र, बापूने कायमच मोठ्या उंचीचे स्वप्न पाहिलेत. केवळ, नुसते स्वप्नरंजनात रमणारा हा तरुण नाही. ते स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणारा आणि प्रचंड मेहनत घेणारा तरुण, अशी ओळख त्याने निर्माण केली आहे.
लहानपणापासूनच समाजकारण आणि राजकारणाची आवड असल्याने विद्यार्थीदशेपासूनच त्यांना राजकीय नेत्यांबद्दल आकर्षण राहिले आहे.
बापूला असणारी सामजिक जाण आणि जाणीव पक्षश्रेष्ठींनी हेरली. त्यातूनच त्यांनी बापूला २५ डिसेंबर २०१९ रोजी इंदापूर तालुका युवक कॉंग्रेसच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवली. मागून येऊन बापू अनेकांना मागे टाकत झपाट्याने पुढे जातोय, हे काही विघ्नसंतोषी लोकांना रुचले नाही. बापूच्या वाटेत अनंत अडचणी आणि काट्यांची पेरणी त्या मंडळींनी केली. मात्र, तो ‘त्या सर्वाना’ पुरून उरला. बापू आणखी वेगाने काम करू लागला. गावातील, पंचक्रोशीतील आणि तालुक्यातील सर्व सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी लढू लागला, वेळप्रसंगी संघर्ष केला. एकदा काम हाती घेतले तर त्याचा निपटारा केल्याशिवाय स्वस्थ न बसण्याचा बापूचा स्वभाव असल्याने, त्याने अद्याप मागे वळून पाहिले नाही. सातत्याने आगेकूच करत आहे. आणि 5 जानेवारी 2023 ला अखिल भारतीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले त्याचबरोबर ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, पुणे जिल्हा काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष आमदार संजय जी जगताप आणि पुणे जिल्हा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बरकडे यांच्या हस्ते बापूसाहेब बोराटे यांची इंदापूर तालुका ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी निवड करून त्यांनी आजपर्यंत केलेल्या कार्याची पोच पावती पक्षाकडून दिली.
बापू बोराटे हा तरुण विविध सामजिक प्रश्नांवर आग्रही भूमिका घेतो, मांडतो. त्या प्रश्नावर कायमचा तोडगा निघावा, म्हणून प्रयत्न करतो. बापू पक्षातील आणि समाजातील महत्वाच्या व्यक्तीच्या नेहमी भेटीगाठी सत्र कायमच सुरु आहे. चर्चात्मक संवादातून तो काही नवीन गोष्टी शिकत आहे. आत्मसात करत आहे. आपले स्थानिक प्रश्न आणि समस्या मोठ्या नेत्यांच्या कानावर घालून ‘त्या’ प्रश्नांना न्याय देण्याचा तो प्रामाणिक प्रयत्न करत आहे.
केवळ दोन – चार वर्षांच्या सामाजिक जीवनात बापुने उभारलेले काम हे खरोखरच कौतुकास्पद म्हणावे लागेल. पक्ष कार्यकारिणीतील पद वगळता हाती काही नसतानाही बापुची ही वाटचाल अनेकांना अचंबित करणारी आहे. त्यामुळेच तालुक्यातील अनेक मोठ्या राजकीय नेत्यांची बापूवर नजर आहे.
अशा या माझ्या दिलदार मित्रास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!!
तरुणांना राजकारणात संधी मिळाल्या पाहिजेत:-संजय शिंदे ,
आपल्या लोकशाहीप्रधान देशात तरुणांची संख्या लक्षणीय आहे. राजकारणात खांदेपालट आवश्यक आहे. सातत्याने संधी देवूनही केवळ विकासाचे ‘व्हिजन’ नसल्याने गावे अद्याप स्वयंपूर्ण होऊ शकली नाहीत. गावांना त्यांच्या हक्काचे शाश्वत उत्पन्नाचे स्रोत निर्माण व्हावेत, यासाठी राजकीय नेते प्रयत्न करताना दिसत नाहीत. तरुणांनासोबत घेत ‘ज्येष्ठ नेत्यांचा अनुभव, तरुणांचे व्हिजन’ असा समन्वय साधला तर गावांना समृद्ध केले जाऊ शकते. मात्र त्यासाठी तरुणांना राजकारणात संधी मिळाल्या पाहिजेत, असे मत राजवर्धन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय शिंदे यांनी ‘आमच्या’शी बातचीत करतांना व्यक्त केले.
शब्दांकन: संजय शिंदे
अध्यक्ष तंटामुक्त समिती शेटफळ हवेली,
संस्थापक अध्यक्ष राजवर्धन ग्रुप