
दैनिक चालु वार्ता मुखेड तालुका प्रतिनिधी- शिवराज पाटील
नांदेड,कंधार: मुखेड पासून जवळच असलेल्या मौजे रुई येथील महात्मा बसवेश्वर माध्यमिक विद्यालय रुई,या शाळेत प्रजासत्तक दिना निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांच्या विविध कला गुनाना वाव मिळन्या साठी विविध मैदानी खेळाचे आयोजन व भाषेन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.व तसेंच दर वर्षी प्रमाणे याही वर्षी सास्कृतिक बाल कला मोहसत्वाचे आयोजेन संस्थेचे मुख्यालय असलेल्या के.बाबारावजि धोंडे एसी आश्रम शाळेत संस्थे अंतर्गत असलेल्या विविध शाळेच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात शाळेने भाग घेतला होता.तसेच प्रजासत्तक दिनाच्या दिवशी शाळेच्या प्रांगणात ध्वजा रोहनाचा कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री.पाटील एस.एस.यांच्या हस्ते पार पडला.तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच उपसरपंच गावातील प्रतिष्ठित नागरिक व माजि विध्यर्थि यांच्या हस्ते पारपडला.या साठी पालक व विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.नंतर गावातील मुख्य रस्त्याने प्रभात फेरी काढण्यात आली.त्यात लेझीम पथक व स्कॉउट संचलन याचे मुख्य आकर्षण होते.बेटी हिंदुस्थानकी या गाण्यावर शाळेतिल मुलींनी सुंदर लेझीम नृत्य सादर केले होते.यासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारीं यांनी प्रश्रीम घेतले.