
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा-सुरेश ज्ञा. दवणे .. मंठा..तालुक्यातील देवठाणा (उस्वद ) ता मंठा जि जालना येथील पुर्णा नदीच्या पत्रातुन
अवैधरित्या वाळूचु चोरटी वाहतुक करणा-या वाहणासह १०,०४,०००/किंमतीचा मुद्देमाल जप्त (ता २८) रोजी सकाळी ०५.३० रात्रगस्त पेटलिंग करित आसतांना एक इसम नाव अतुल नारायण वरकड रा. तळतोंडी ता मंठा हा देवठाणा (उस्वद ) गावाजवळील पुर्णा नदीच्या पुलाजवळ एक लाल व पिवळ्या रंगाच्या विना नंबर च्या टिपर मध्ये पुर्णा नदी पात्रातुन अंदाजे सव्वाब्रास रेती चोरी करतांना मिळुन आला.
सदर पोलीस अंमलदार अरुण तोताराम बोर्डे वय यांचे फिर्यादीवरु न पोलीस ठाणे मंठा येथे सदरचे टिप्पर व त्यातील रेती किमंत १००४०००/- असे मुद्देमाल जप्त करुन सदर टिप्पर चालक अतुल नारायण वरकड रा. तळतोंडी ता मंठा व मालक बाजीराव शिवाजी बोराडे रा मंठा यांचे विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर कार्यवाही मा पोलीस अधिक्षक अक्षय शिंदे व उपविभागीय पोलीस अधिकारी राजु मोरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय देशमुख, फौजदार बलभीम फौजदार समान शिंदे व पोलीस अंमलदार अरुण बोर्डे, रखमाजी मुंढे, विलास कातकडे, प्रदिप आढाव, मांगीलाल राठोड, दिपक आडे, प्रशांत काळे, विजय जुंबडे, श्याम गायके, पांडुरंग हागवणे, संदिप राठोड, आसाराम मदने. कान्हाबाराव हाराळ, केशव चव्हाण यांनी अवैद्य रेतीचे टिप्पर व त्यांचे चालक व मालक यांचे विरुध्द कायदेशिर कार्यवाही करण्यात आली असुन सदर गुन्हयाचा तपास रखमाजी मुंढे करीत आहे.