
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा.. शहरात शिक्षक मतदार संघासाठी एकूण १४ उमेदवारासाठी केंद्र क्रमांक ६५ वर ८६.५% टक्के मतदान झाले. असल्याची माहिती केंद्रप्रमुख विष्णू राठोड यांनी दिली आहे.
शिक्षक मतदार संघाच्या एकूण १४ उमेदवारासाठी ४०० पैकी ३४६ मतदारांनी आपला मतदान हक्क बजावला आहे.
आज सकाळपासूनच केंद्र क्रमांक ६५ वर मतदान करण्यासाठी मतदाराचा गर्दी दिसून आली. या मतदान केंद्राला भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, काँग्रेसचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया, शिवसेना जिल्हाप्रमुख ए.जे बोराडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल आकात, आदींनी भेट दिल्या.
यावेळी पोलीस निरीक्षक संजय देशमुख फौजदार बलभीम राऊत फौजदार आसमान शिंदे यांनी चौक पोलीस बंदोबवर ठेवला व सर्व मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली