
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
नांदेड: कंधार:-प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जनता हायस्कूल कौठा येथे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचा शुभारंभ संस्थेचे उपाध्यक्ष नागोराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
जनता हायस्कूल कौठा येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दि २७ जानेवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी शाळेच्या वतिने कार्यक्रम ठेवण्यात येतो असे मुख्याध्यापक जगनाथ मुंडे यांनी सांगितले यावेळी विद्यार्थ्यांनी लावणी मराठी हिंदी गीतांवर विविध कला सादर केली यावेळी पालकांची उपस्थिती लक्षणीय होती केन्द्र प्रमुख संतोष दिनकर वैद्यकीय अधिकारी द्वारकादास शेळके आदि मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक जगनाथ मुंडे राहुल रुद्रावार एकनाथ भगनुरे. शमशोद्दिन सय्यद मलदोडे मन्मथ देशमुख पाटील सर डूबुकवाड सर पवार सर सोमनाथ पालिमकर आदिने परिश्रम घेतले.