
दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी -शिवकुमार बिरादार
मुखेड.ग्रामसमृद्धीचे प्रणेते, थोर समाजसुधारक, किर्तनाच्या माध्यमातून जनजागृती करणारे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंती विशाल निमित्त धोबी समाजबांधवांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीरात ५१ रक्तदात्यांनी रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी जोपासली.
शहरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी २३ फेब्रुवारी रोजी गाडगे बाबांच्या जयंती निमित्त समाज बांधवांच्यावतीने शहरातील धोबी गल्लीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन विरुपाक्ष शिवाचार्य महाराज, माजी जि. प. सदस्य दशरथराव लोहबंदे, शिवसेना युवासेना जिल्हाधिकारी डॉ. व्यंकटेश मामीलवाड यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे घेतले.
जयंती निमित्त युवा नेते राहूल लोहबंदे, शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख नागनाथ लोखंडे, शहर प्रमुख शंकर चिंतमवाड, चंद्रकांत गरुडकर, , विनोद आडेपवार, रियाज शेख, बबलू मुल्ला, संभाजी ब्रिगेडचे बालाजी पाटील सांगवीकर, शेतकरी पुत्र बालाजी ढोसणे, रमाकांत पाटील जाहूरकर, युवक काँग्रेसचे गायकवाड, शंकर पिटलेवाड, गजानन लंगेवाड, अदनान पाशा, एस. के. बबलू, पत्रकार संदिप पिल्लेवाड यांनी भेट दिली. रक्तदान शिबिर व जयंती साजरी करण्यासाठी राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंती समितीचे अध्यक्ष मारोती विभुते, उपाध्यक्ष संग्राम भुरे, सचिव बालाजी मामीलवाड, कोषाध्यक्ष चंद्रकांत डोंगरे, राजेश विभुते, माधव तडखेलकर, नागेश मामीलवाड, शिवा मुखेडकर, माधव डोंगरे, साई डोंगरे, युवासेना शहर समन्वयक योगेश मामीलवाड यांच्यासह संत गाडगेबाबा जयंती महोत्सवाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.