
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:बिलोली तालुक्यातील गागलेगाव येथील हनमंत पांचाळ वय वर्ष ८५ यास वामन डुमणे यांच्या मुलीवर करणी करणी केली असे म्हणून रत्नदीप डुमणे, वामन डुमणे रा. गागलेगाव व दयानंद वाघमारे या तिघांनी संगणमत करून मारहाण केली व त्यात त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी मारोती पांचाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून
वाम डुमणे, रत्नदीप डुमणे आणि दयानंद वाघमारे यांच्याविरुध्द रामतीर्थ पोलीस ठाण्यात कलम ३०२, ३४२, ३४ भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. (यामध्येजादूटोणा विरोधी कायद्याचे चे कलम लावण्यात आले नाही. ही बातमी कळताच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य सम्राट हटकर, जिल्हा प्रधान सचिव कमलाकर जमदाडे, नायगाव शाखेचे अध्यक्ष हनुमंतराव खांडगावकर व प्रधान सचिव भाऊराव मोरे यांनी ताबडतोब गोगलेले गाव गाठून पांचाळ कुटुंबीयांची भेट घेतली. घटनास्थळाची पाहणी केली व गावकऱ्यांशी चर्चा केली. रामतीर्थ पोलीस स्टेशनला जाऊन पोलीस सायकनिरीक्षक संकेत दिघे यांची भेट घेऊन चर्चा केलीजादूटोणा विरोधी कायद्याचे चे कलम लावण्यात आले नाही. ही बातमी कळताच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य सम्राट हटकर, जिल्हा प्रधान सचिव कमलाकर जमदाडे, नायगाव शाखेचे अध्यक्ष हनुमंतराव खांडगावकर व प्रधान सचिव भाऊराव मोरे यांनी ताबडतोब गोगलेले गाव गाठून पांचाळ कुटुंबीयांची भेट घेतली. घटनास्थळाची पाहणी केली व गावकऱ्यांशी चर्चा केली. रामतीर्थ पोलीस स्टेशनला जाऊन पोलीस सायकनिरीक्षक संकेत दिघे यांची भेट घेऊन चर्चा केली.