
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
मोखाडा बोहाडा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोखाडा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संजय कुमार ब्राह्मणे यांनी शांतता कमिटी व जगदंबा मंदिराच्या ट्रस्टीं सोबत मोखाडा पोलीस स्टेशन येथे बैठकी दरम्यान संवाद साधला असल्याची माहिती दिनांक 5 मार्च वार रविवार रोजी मिळत आहे यावेळी पोलीस उपनिरीक्षक संजय दरगुडे हे सुद्धा या बैठकीदरम्यान उपस्थित होते.
संजय कुमार ब्राह्मणे हे शिस्तप्रिय अधिकारी असून त्यांना मागील वर्षाच्या बोहाड्याचा अनुभव सुध्दा आहे.
यावेळी जगदंबा मंदिराच्या ट्रस्टी व शांतता कमिटीच्या सदस्यांसोबत संवाद साधताना त्यांनी बोहाडा उत्सव शांततेत सौहार्दपूर्ण व सामाजिक सलोखा राखत भक्तिमय वातावरणात साजरा करण्याचे आवाहन केले.हे करत असताना जर कोणी सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले.यावेळी बोलताना ब्राह्मणे यांनी की सोंगादरम्यान गर्दी होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना केल्या. बाहेरून येणाऱ्या दुकानांचे नियोजन करताना दुकाने रस्त्यावर येणार नाहीत याची खबरदारी घेतली जावे अशी सूचित केले. नगरपंचायतने प्रकाश व्यवस्था काळजीपूर्वक सांभाळण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. तसेच कोणताही गैरप्रकार किंवा निष्काळजीपणा होणार नाही याचे भान ठेवून उत्सवाला सामोरे जाण्याचे आवाहन देखील यावेळी संजय कुमार ब्राह्मणे यांनी केले आहे.
यावेळी जगदंब शांतता कमिटीचे सदस्य व जगदंबा ट्रस्ट उपस्थित. मोखाडा प्रतिनिधी:सौरभ कामडी