
दैनिक चालु वार्ता अंबड प्रतिनिधी -ज्ञानेश्वर साळुंके
उन्हाचा तडका वाढवून असताना आज दुपारच्या नंतर
अचानक वातावरणात बदल होऊन सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान हवा बरोबर झालेल्या अवकाळी पावसाच्या शेतकरी वर्ग चिंतेत आहे धनगर पिंपरी महसूल मंडळ मधे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे.अंबड तालुक्यातील 7 मार्च रोज ग्रामीण भागातील जोरदार पाऊस झाला असून यात गहू सोयाबीन व कांदा ज्वारी हरभरा मोठ्या प्रमाणात नूकसान झालेले आहे व
त्याचप्रमाणे आंबे फळबाग धारकाचे मोठे नुसाकन झाले आहे तरी त्याच प्रमाणे काही भागात विद्युत पुरवठा खंडित झाल्याने होळीअंधारात साजरी करावा लागली
दुपारनंतर ढग जमा झाले व दुपारी पाच नंतर वारे वाहू लागुन सायंकाळी 6च्या दरम्यान अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना काढणीसाठी तयारीत असलेला गहू हरभरा झाकण्यासाठी धावपळ झाल्याने दिसुन आले त्याप्रमाणे मोठे नुकसान झाले आहे तसेच झाडावर बहरलेल्या आंब्यांना वादळी वाऱ्यासह तडाखा बसला असुन झाडाखाली
आंब्यांना गळ मोठे प्रमाणे झाला असुन आंब्यां मोहराचा सडा पडलेला होता त्याच प्रमाणे
कांद्याच्या बियाणेचा उत्पादित करण्याच्या शेतकऱ्यांचे बियाचे डोगळे .फूलाचा गूच्छ ही विखरुन खराब झाल्याचे चिञ दिसत आहे