
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
गंगाखेड (प्रतिनिधी)
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने औरंगाबाद पुणे नंतर थेट दिल्ली येथे प्रदेश पातळीवरील ब्रह्मोद्योग चे दिली येथील फाईव्ह स्टार हॉटेल अशोका मध्ये आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी कार्यक्रमाचे उद्घाटक महाराष्ट्राचे तात्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, खा.अरविंद शर्मा,विश्वप्रसन्न तीर्थस्वामीजी महाराज,अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.गोविंद कुलकर्णी,आदींनी कार्यक्रमाचे उद्घाटन करून दीपप्रज्वलन केले व व्यासपीठावरील मान्यवरांचे कार्यक्रमाचे अध्यक्ष त्रिवीकाम जोशी यांनी स्वागत केले यावेळी व्यासपीठावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशातील ब्राह्मण समाज कधी कोणालाही काहीच मागत नाही आजपर्यंत सक्रिय कार्य करून इतरांना काहीतरी दिलेलेच आहे त्यामुळे ब्राह्मण समाज हा श्रेष्ठ आहे असे गौरवदगार काढून मोलाचे मार्गदर्शन केले केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सध्याच्या युवकांनी नोकरीचे फ्याड डोक्यात न ठेवता उद्योग व्यवसायाकडे वळले पाहिजे असे परखड मत मांडले तर खा.डॉ. अरविंद शर्मा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून युवकांनी पुढाकार घ्यावा व उद्योग व्यवसायात उतरावे प्रगती निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही असे म्हटले यावेळी पहिल्या सत्रात कार्यक्रमाच्या आयोजनात सत्यजित कुलकर्णी,दिनेश एडिया,अमरेश कुमार त्यागी,नीरज शर्मा,राजीव कश्यप, अंकुर गौर,हिमांशू शर्मा,संतोष कुलकर्णी,रमणाचार्य नॅशनल प्रेसिडेंट व कमिटीच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी डॉ.श्याम रघुनंदन यांनी सर्वांचे आभार मानले दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियमवर घेण्यात आलेल्या पदाधिकारी संमेलनास देशभरातून आलेले पदाधिकारी ब्रह्म ग्रंथ दिग्गज उद्योजक केंद्रीय व राज्यातील मंत्री गण महिला व तरुण उद्योजक आदींची लक्षनिय उपस्थिती होती अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे आयोजित केलेल्या ब्रह्मोद्योग या भव्य राष्ट्रीय परिषदेच्या समारोप प्रसंगी केंद्रीय मंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी परिषदेला संबोधित केले कार्यक्रमाचे अध्यक्ष अरविंद शर्मा यांनी भव्य परिषदेला संबोधित करताना सांगितले की ब्राम्हण समाज एकटा कधीही चालत नाही सर्वांना सोबत घेऊन चालतो तसेच खा.मनोज तिवारी यांनी स्टेडियम मधील एवढी मोठी परिषद पाहून भारावून गेले यावेळी खा.महेश शर्मा यांनी लोक नेहमी देणाऱ्याच्या पायाला हात लावतात मात्र शहरात बसलेल्या भिकाऱ्याच्या पायाला कोणी हात लावत नाही असे संबोधित केले अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.गोविंद कुलकर्णी म्हणाले देशाच्या कानाकोपऱ्यातून कार्यक्रमासाठी पोहोचलेल्या ब्राह्मण समाजातील नागरिकांचे आभार म्हणून आपण काय खावे काय प्यावे काय परिधान करावे आधीवर विचार करून ब्राह्मणांना आपला स्वभाव बदलावा लागेल जेणेकरून नवा ब्राह्मण समाज निर्माण होईल असे परखड शब्दात मोलांचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमास ब्राह्मण नेते अमरेश कुमार त्यागी,अनिल त्यागी, निरज शर्मा, संतोष कुलकर्णी, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता संजय कुलकर्णी(सुपेकर),शशिकांत कुलकर्णी,विजय कुलकर्णी,गणेश खेडकर, दीप्ती कुलकर्णी, सीमा कुलकर्णी ,शुभांगी आयाचित,केतकी कुलकर्णी ,मंदार रेडे, ऋचा पाठक,नांदेड येथील महिला व पुरुष यांची टीम व गंगाखेड येथील महिला व पुरुष यांची टीम आदीसह ब्रह्मोद्योग यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ शाखा गंगाखेडने सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक समाज हिताचे सार्वजनिक एका वर्षात 47 कार्यक्रम घेऊन महाराष्ट्रात अव्वल नंबर पटकवल्याचे प्रॉस्पेट काढले व 2023 ची पंचांगयुक्त आकर्षक दिनदर्शिका काढून महाराष्ट्रातील असंख्य अग्निहोत्रीच्या हस्ते प्रकाशन केले या दोन्ही कार्यक्रमाचे दिल्ली व्यासपीठासह स्टेडियम मध्ये वाटप करण्यात आले या दोन्ही कार्यक्रमात केंद्रीय मंत्री खासदार आमदार उद्योजक पदाधिकारी संत महंत उपस्थित होते यावेळी दिल्लीत गंगाखेडच्या कार्याचे सर्वत्र कौतुक झाले.