
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम :- तालुक्यातील पाथरूड येथे ८ मार्च,महिला दिनानिमित्त,वंदनीय हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 80% समाजकारण व 20 टक्के राजकारण या विचारानुसार,शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून,शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा संघटक कल्याणी ताई बोराडे डोके यांच्या सौजन्यातून,मौजे पाथरूड तालुका भूम जिल्हा धाराशिव येथे शिवअमृत पानपोई चे उद्घाटन सुप्रसिद्ध व्याख्याता तथा निवेदिका क्षिप्रा ताई मानकर यांच्या हस्ते संपन्न झाले.याप्रसंगी युवासेनेचे जिल्हाप्रमुख डॉ.चेतन बोराडे,जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष शिवमती ताई बोराडे -चौधरी,गावच्या सरपंच सौ.विजया शिवाजी तिकटे,उपसरपंच प्रा.तानाजी बोराडे,शिवाजीराव तिकटे,जेष्ठ नेते संजय बोराडे,सोसायटी चे चेअरमन धनंजय बोराडे,जीवन बोराडे,महिला सदस्य डॉ.अश्विनी बोराडे,डॉ. दिव्या पवार किस्किंदा बेडके,गौरी बोराडे,
गावातील ज्येष्ठ नागरिक जग्गनाथ तीकटे,बंडू जोशी,चंद्रकांत खुणे,श्रीकांत बोराडे,बाप्पा पवार,धोंडिबा टिळक,ग्राम अधिकारी भागवत राठोड,वसुदेव बोराडे,लालासाहेब वडेकर,कोंडीबा चौगुले यांच्यासह इतर नागरिक सदस्य व महिला भगिनी आदी उपस्तित होत्या.उन्हाची दाहकता स्पष्ट जाणवत असल्याने शिव अमृत पानपोई च्या माध्यमातून संपूर्ण उन्हाळाभर थंडगार पाणी पिण्यासाठी मिळत असल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.