
दैनिक चालु वार्ता चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी -दीपक कटकोजवार
चंद्रपुर ,गडचिरोली जिल्हा गायत्री परिवारांतील महिला मंडळाच्या वतीने वर्षभरात केलेल्या कार्याच्या आधारे “नारी शक्ति सन्मान” कार्यक्रमां अंतर्गत विविध क्षेत्रातील महिलांना सन्मानीत करण्यात येत असते.
*गायत्री परिवार महिला मंडळाच्या वतीने श्रीमती प्रभा मामीडवार यांच्या प्रेरणेने यावर्षी सौ पुष्पा नागोसे यांच्या अध्यक्षतेखाली , वरिष्ठ मार्गदर्शक श्रीमती राजकुमारी पांडेय यांच्या उपस्थितित या कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती वेद माता गायत्री शक्तीपीठाच्या निकटवर्तीयांकडुन मिळाली आहे.
8 मार्च 2023 ला दुपारी 3.30 वा. आंतरराष्ट्रीय महिला दिवसाचे यशस्वी आयोजन चंद्रपुरातील श्री वेदमाता गायत्री शक्तिपीठ चंद्रपुर येथे झालेल्या सत्कार कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूर-गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सुविद्य पत्नी *सौ.सपनाताई सुधीर मुनगंटीवार तसेच डॉ.उर्वशी माणिक व डा.मनीषा घुग्गल* यांच्या शुभहस्ते गायत्री परिवारातील उत्कृष्ठ कार्य करणा-या माता, भगिनीं सौ.अनीता नरेंद्र बोबडे-(आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र राज्य ),
सौ प्रमिला पांडुरंग पाकमोड़े,
श्रीमती कमला डीडपाये,सौ.शीतलताई वासलवार,
सौ.संगीता प्रभाकर मालोदे,
सौ.अश्विनी अतुल अल्याडवार ,
सौ.बेबीताई शंकर निखारे,
सौ.शकुन्तला भाऊराव मोरे,
सौ.सुनीता भास्कर तेल्लावार,
सौ.दिव्यानी भूपेंद्र उपरे,
सौ.भारती संजय मिश्रा,
सौ.पूजा संदीप दीक्षित, सौ.मायाताई त्रयंबक घोटेकर,
सौ.मंदाताई अंभोलकर,
सौ. लक्ष्मीताई भांडेकर,
सौ वंदना यादवराव चहारे, सौ पूनम झा,
आशाताई अतकमवार,
सौ माधुरी अमोल बट्टूवार या सर्वांचा सत्कार करण्यात आला. तर प्रमुख अतिथींचा सत्कार गायत्री परिवारातील जेष्ठ कार्यकर्त्यांनी केला…