
दैनिक चालु वार्ता मुखेड तालुका प्रतिनिधी- सुरेश जमदाडे
येथील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील संस्कृत विभागाचे विभाग प्रमुख प्रा.डॉ. गणंजय यज्ञेश्वर कहाळेकर यांची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ , नांदेडच्या संस्कृत विषयाच्या अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून नुकतेच निवड करण्यात आले . यापूर्वी सदरील अभ्यास मंडळाच्या अध्यक्ष पदी सुध्दा अनुभव घेतलेले आहेत .
या निवडीबद्दल वीरभद्र शिक्षण संस्थेचे पदाधिकारी व संचालक मंडळ , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.बी.अडकिणे , मराठी विभाग प्रमुख प्रा.सी.बी.साखरे , स्टाँफ सेक्रेटरी प्रा.डॉ. डी.के.आहेर , ज्युनिअर काँलेजचे उपप्राचार्य प्रा.एस.बी.बळवंते , अधिक्षक एस.के.सुर्यवंशी तसेच वरिष्ठ , कनिष्ठ आणि व्यवसाय अभ्यासक्रमाचे प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकडून अभिनंदन करून कौतुक केले जात आहे .