
दैनिक चालु वार्ता चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी- दीपक कटकोजवार
महाराष्ट्राचे वने मत्स्यव्यवसाय व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपुर गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार, ओबीसी आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहीर , चंद्रपुर ग्रामीण जिल्हा भाजपाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या कार्यशैलीतुन प्रेरणा घेऊन समाज सेवा हिच ईश्वरी सेवा समजून सदैव समाजसेवेसाठी तत्पर असणारे उत्तर भारतीय मोर्चाचे युवा जिल्हाध्यक्ष रूद्रनारायण तिवारी
व उत्तर भारतीय महिला मोर्चाच्या नवनियुक्त जिलाध्यक्षा श्रीमती बंदनाताई सिन्हा यांच्या प्रयत्नातून भाजपाचे ज्येष्ठ नेते वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितित आज विसापुर जवळील चंद्रपूर-बल्लारपूर मुख्य रोडवरील वृद्धाश्रमात जागतिक महिला दिनानिमित्य वृद्धाश्रमात राहत असलेल्या आईवडील समान वृध्दांसाठी खास भोजनदान कार्यक्रम आयोजित करून वृध्द मंडळीं सोबतच नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी सुध्दा भोजन केले. याप्रसंगी बल्लारपुर शहर भाजप अध्यक्ष काशीनाथ सिंह, महिला मोर्चाच्या ग्रामीण जिलाध्यक्षा कु. अलकाताई आत्राम, भाजपा आत्मनिर्भर भारत सेल अध्यक्षा सौ.किरणताई बुटले आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. उत्तर भारतीय मोर्चा जिल्हा महामंत्री सुरेंद्रनाथ सिंह, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कुमार यादव ,उत्तर भारतीय महिला मोर्चा जिल्हा महामंत्री श्रीमती ममता राजभर,श्रीमती गिता सिंह, उत्तर भारतीय महिला मोर्चा महानगर जिल्हाध्यक्षा श्रीमती लिलावती रविदास, भाजपा महानगर जिल्हा सचिव तेजा सिंह, महानगर जिल्हा महामंत्री मुकेश यादव, रंजन सिंह ठाकुर, अल्पसंख्यक आघाडीचे बल्लारपुर शहर अध्यक्ष अजहर शेख, जिला सचिव अनिष ठाकुर,राजु चौहान या कार्यक्रमात सहभागी झालेल्या भाजप व उत्तर भारतीय मोर्चाच्या सर्व नेत्यांचे व कार्यकर्त्यांप्रती आश्रमातील वृध्दांनी आनंद व्यक्त केला