
दैनिक चालू वार्ता निलंगा प्रतिनिधि- इस्माईल महेबूब शेख़.
====================
दिनांक 11/ 3 /2023 रोजी ता. जि.लातुर बाभळगाव, सारोळा, सोनवती, धनेगाव येथे महाराष्ट्र शासन, ग्रामविकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या अशा किरण जेंडर संसाधन केंद्र लातूर यांच्या विद्यमानाने ग्रामपंचायत कार्यालय बाभळगाव व दयानंद विद्यालय बाभगाव येथे आज आशा किरण जेंडर संसाधन केंद्र मार्फत GRC देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांची माहिती महिला व किशोरवयीन मुले मुली यांना लिंग समानता विषयी जाणीव जागृती कार्यक्रम फिरते मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून बालविवाह रोखण्यासाठी चित्रफीत दाखवण्यात आली या कार्यक्रमासाठी बाभळगाव चे उपसरपंच मा. श्री. गोविंद देशमुख साहेब तसेच ग्रामपंचायत सदस्य मा. श्री. ऍड. कैलास मस्के साहेब व मा. श्री माने सर उपस्थित होते मा. श्री उपसरपंच साहेबांनी किशोरवयीन मुलांशी संवाद साधला स्त्री पुरुष समानता विषयी त्यांनी मार्गदर्शन केले तसेच दयानंद विद्यालय बाभळगाव येथील माननीय श्री मोरे जी एस पर्यवेक्षक यांनी बालविवाह कायद्याविषयी माहिती मार्गदर्शन केले तसेच प्रभाग समन्वयक सीमा कांबळे मॅडम आशा किरण जेंडर संसाधन केंद्र मार्फत देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांची माहिती महिलांना व शाळेतील विद्यार्थ्यांना दिली. या कार्यक्रमासाठी दयानंद विद्यालय बाभळगाव येथील सर्व शिक्षक वृंद यांनी मदत केली तसेच या कार्यक्रम यशस्वीतेसाठी अंगणवाडी कार्यकर्तेी शोभा माळी ,सुनीता कदम, शारदा कासले, राजश्री आरदवाड, कार्यकर्ते मदतनीस अशा कार्यकर्ते यांनी मदत केली.