
दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी – शिवकुमार बिरादार
मुखेड : महाराष्ट्र राज्यातील शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटनेच्या वतीने कर्मचाऱ्याची नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना चालू करावी यासह महत्त्वाच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी 14 मार्च पासून होणाऱ्या बेमुदत संपात तालुक्यातील सर्व ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक , ग्रामसेविका सहभागी होणार असल्याचे ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष कृष्णा रामदिनवार यांनी गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे कळविले आहे.
14 मार्चपासूनच्या बेमुदत संपावरील मागण्या मान्य होईपर्यंत माघार घेतली जाणार नाही त्या मागण्यात नवीन पेन्शन योजना रद्द करण्यात यावी , जुनी पेन्शन योजना चालू करण्यात यावी, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती त्वरित करण्यात यावी , करोना काळात मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना सूट द्यावी , सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करावे , आदिवासी नक्षलग्रस्त भागातील कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजने व्यतिरिक्त एक स्तर वेतन वाढीचा लाभ कायम ठेवण्यात यावा या संबंधित कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग प्रोत्साहन पर भत्ता लागू करण्यात यावा, सर्व रिक्त पदे त्वरित भरण्यात यावे , कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात यावी अशा विविध मागण्यासाठी चे निवेदन पंचायत समिती मुखेड चे गटविकास अधिकारी श्री मिथुन नागमवाड यांना देण्यात आले त्यावेळी ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष कृष्णा रामदिनवार, सतीश गायकवाड सचिव, संजय जाधव, अंतेश्वर इंगळे, सय्यद नजीर, बि डी पाटील , उत्तम शिरसे, पांडुरंग नागेश्वर , सचिन पाटील, संतोष गुमडे, गोंदलवाड सि टी, सिंधुताई भवर, गजानन मामीलवाड, योगेश डावखरे , प्रवीण बारमाळे, शुभम भंगे, सचिन पांचाळ , मैफूसदिन मनियार सर्व पदाधिकारी उपस्थित होते .