
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधि मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
मंठा येथील नानसी पुनर्वसन येथे नाफेड हरभरा खरेदी केंद्राचे उदघाटन मा.मंञी तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले.
केंद्र शासनाच्या आधारभुत किंमत खरेदी योजने अंतर्गत खरेदी केल जाणाऱ्या रब्बी हंगामा २०२२-२३ साठी नाफेड म्हणजेच नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑप.मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने हरभरा खरेदी करण्यास केंद्राना मंजूरी दिली असून या वर्षी मंठा तालुक्यात दोन खरेदी केंद्राना मान्यता मिळाली आहे.यात एक नानसी शेतकरी धान्य अधिकोष बहुउद्देशीय सहकारी संस्था व ढोकसाळ येथे फार्मर पड्युसर कंपनी.यात नानसी शेतकरी धान्य अधिकोष बहुउद्देशीय सहकारी संस्थेच्या खरेदी केंद्राचे ( ता.१९ ) रविवार रोजी लोणीकर यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
यावेळी सतीश निर्वळ यांनी सांगितले कि १४ मार्च पासुन हरभरा खरेदी करण्यास सूरूवात झाली चार दिवसात ९७० किंटल हरभरा खरेदी केला.आमच्या तीन गाड्या परतूरला उभ्या आहेत.नाफेड बारदनामुळे माल घेत नाही. पण खरेदी केंद्राला जो बारदना आला तो महाराष्ट्र शासनाने दिला परंतु नाफेड तो घेत ही मोठी अडचन केंद्रापुढे असून लोणीकर साहेबांनी ज्या पद्धतीने विधानसभेमध्ये नाफेड मार्फत हरभरा खरेदी करण्यासाठीचा मुद्दा मांडला व खरेदी केंद्र सुरू झाले.त्याच पद्धतीने बारदनाच्या प्रश्न मार्गी लावावा.
यावेळी बोलतांना लोणीकर यांनी सतीश निर्वळ यांच्या विविध क्षेञात केलेल्या कार्याच कौतुक करत त्यांच सत्कार केल.पुढे बोलतांना लोणीकर म्हणाले कि शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळाव यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र शासनाच्या आधारभुत किंमत नाफेड मार्फत शेतकऱ्याच माल खरेदी करण्यात यावा व आठ दिवसाच्या आत शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा करण्यात यावे ही तरतूद केली.पुढे बोलतांना लोणीकर म्हणाले कि आज व्यापारी हरभरा ४४.५०रू किंटल प्रमाणे खरेदी करत आहे परंतु नाफेड मध्ये याची खरेदी ५३.३५रू किंटल आहे ज्यामुळे शेतकऱ्यांच किंटलमागे १०००रू फायदा होत आहे. शेतकऱ्यांनी वेळेवर नोंदणी करून हरभरा खरेदी केंद्रावर टाकावे असे आव्हान केले.
यावेळी सतिश निर्वळ ता.प्र.भा.ज.पा.तथा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, संदीप गोरे मा सभापती,प्रल्हाद बोराडे मा उपसभापती,कैलास बोराडे, पंजाब बोराडे,नागेश घारे, शिवाजी खंदारे, अंकुशराव बोराडे, राजेश मोरे, संजय भालेराव, श्रीनिवास देशमुख, संजय छल्लाणी, सचिन बोराडे, वौजीनाथ बोराडे,विठ्ठल काळे, राजेश मस्के, राजेभाऊ खराबे यांच्यासह तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.