
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी -नवनाथ यादव
भूम तालुका शिवसेना पदाधिकारी शिवसैनिकांकडून गौतम लटके सर यांचा शिवसेनेत प्रवेशाबद्दल सत्कार करण्यात आला
भूम:- आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे दमदार पालकमंत्री नामदार प्रा.डॉ.तानाजीराव सावंत साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गौतम लटके सर यांचा जाहीर प्रवेश झाल्याबद्दल शिवसेना भूम तालुक्याच्या वतीने सत्कार पंचायत समिती येथे करण्यात आला.गौतम लटके यांच्या घर वापसीमुळे भूम-परंडा-वाशी तालुक्यातील शिवसैनिकांना बळ मिळणार आहे. तळागाळातील सर्व सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांची मदत होणार असून राज्याचे आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत साहेब यांच्या धाराशिव जिल्ह्यासाठी सुजलाम सुफलाम करण्यासाठी लोक कल्याणकारी योजना पोचणार आहेत.त्यामुळे ग्रामीण भागासह शहरी भागातील कार्यकर्त्यांना उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा भैरवनाथ शुगर सोनारी संचालक धनंजय दादा सावंत, उपजिल्हाप्रमुख दत्ता बापू मोहिते ,महिला आघाडी जिल्हाप्रमुख अर्चनाताई दराडे , महीला तालुका प्रमुख ताई लांडे, तालुकाप्रमुख बालाजी बापू गुंजाळ ,तालुकाप्रमुख परंडा अण्णासाहेब जाधव, युवा सेना तालुकाप्रमुख निलेश दादा चव्हाण, युवा सेना समन्वयक जिल्हा प्रवीण भैय्या देशमुख, माजी सभापती अण्णा भडके, तालुका संघटक वैजनाथ म्हमाणे, उपतालुकाप्रमुख सुग्रीव मुरूमकर, गटनेते सरपंच विशाल बापू ढगे, ग्रा.सदस्य युवा नेते समाधान सातव, सरपंच अजित पवार ,भुम बाजार समिती संचालक युवराज तांबे ,शहर प्रमुख संजय पवार, निलेश शेळवणे , युवा सेना विभाग प्रमुख प्रमोद शेळके,शिवसेना वैद्यकीय मदत कक्षचे पांडुरंग धस, चिंचोली गणप्रमुख दत्तात्रय काळे , सोशल मीडिया मुकेश भगत ,भरत सुरवसे ,तसेच इतर पदाधिकारी सरपंच उपसरपंच व इतर पदाधिकारी उपस्थित होते.