
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
मंठा तालुक्यातील ग्रामीण भागात
शेतकऱ्यांच्या नवीन वर्षाची सुरूवात गुढी पाडव्याला होत असते. पाडवा सण येण्याच्या महिन्यावर अगोदर पासुन शेतीची कामे करण्यासाठी सालगडी नोकर शोधणे सुरू असत .कारण नव्या वर्षी सकाळी उठून गुढी उभारून शेतकरी सालगडी ठरवण्याची बैठक घेतात त्यात गडी ठरला की लगेच शेती औजाराला बैल जुपून पुजा करून शेतात तास काढून नवीन वर्ष्याच्या शेती कामाला सुरुवात करतात. कीत्येक वर्षापासून शेतीकामात सालगडी महत्वाचा भाग झाला आहे. सालगड्याला वर्षाकाठी काही रक्कम व धान्याच्या स्वरूपात मोबदला दिला जातो.जसजसा काळ बदलतो, सालगड्याच्या मोबदल्यात वाढ झाल्याचे पाहावयास मिळत आहे. मंठा तालुक्यात सधन शेतकरी आहे. ते सांगतात, आजघडीला लाखाच्यावर मोबदला द्यावा लागत आहे. तालुक्यातील शेतकरी यांत्रिक शेतीकडे वळला असला तरी, सालगड्याचे महत्व आजही कायम आहे. काही मोठे शेतकरी एकापेक्षा अधिक सालगड्याची नेमणूक करतात. यांत्रिक शेती करणाऱ्यांची संख्या फार कमी आहे. त्यामुळे अनेक जण सालगडीच ठेवतात.
🎆पाडवा झाला तरी गडी नाही मिळाला
कितीही संकटे आली, तरी शेतकरी आपले काम चालूच ठेवतो. गववर्षीची नुकसानीची कात झटकून पुन्हा शेतीच्या कामाला लागला आहे. यंदा एक महिन्या पासुन शेतकऱ्यांची सालगड्यांसाठी लगबग सुरू असल्याचे चित्र मंठा तालुक्यात दिसत होत पण पाडवा होनही साल गडी मिळणं कठीण झालं आहे.
🎆शेती करावी, तर कशी
वाढल्या महागाईचा सामान्य नागरिकांना फटका बसता असला तरी यात सर्वाधिक फटका हा शेतकरी वर्गाला सहन करावा लागत आहे.कारण निरसर्गाचा लहरीपणा कायम आल्यामुळे उत्पन्नाट घट तसेच गतवर्षी बि-बियाणे, खते, औषधी, मजुरी आदींसह वाहतुकीच्याही दरात वाढ झाली. आता नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शेतीकामाचया मदतीसाठी सालगड्याचा शोध घेत आहोत. यंदा सालगड्यांचे दर कडाडले आहे. शिवाय धान्याचाही बोली केली जात आहे. त्यामुळे शेती करावी तर कशी असा प्रश्न आहे.