
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भुम:- तालुक्यातील रामकुंड- वाकवड- सोनगिरी या ठिकाणी विविध कामाचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला माजी मंत्री आ.विधानपरिषद राष्ट्रनायक महादेवजी जानकर साहेब यांच्या आमदार फंडातून केलेल्या कामाचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते साहेब यांच्या मुख्य महासचिव माऊली नाना सलगर साहेब यांच्या हस्ते लोकार्पण पार पडले.सदरील विकास कामे रामकूंड- हायमस्ट बसवुन विधुतीकरण, सोनगिरी -सिमेंट रस्ता, वाकवड -सिमेंट रस्ता करणात आले.
प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य आश्रुबा कोळेकर साहेब, मराठवाडा अध्यक्ष विष्णू गोरे सर ,धाराशिव जिल्हा निरीक्षक डॉक्टर शेंडगे साहेब ,राष्ट्रीय समाज पक्षाचे आदरणीय नेते नानासाहेब मदने, रघुनाथ वाघमोडे मराठवाडा संघटक, जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट विकास पाटील ,महिला जिल्हाध्यक्ष पाटील मॅडम होते. तर प्रदेशाध्यक्ष शेवते नानांनी अजून भविष्यात जास्तीत जास्त निधी या तालुक्यात देण्याचे काम करू तसेच तालुक्यातील सर्वच जागा स्वबळावर जिल्हा परिषद ,पंचायत समिती ,भुम परंडा वाशी विधानसभा खेचुन आणण्यासाठी विकासकामाच्या माध्यमातून ताकद देऊ असे आश्वासन दिले. यावेळी राम मासाळ वाकवड ,बालाजी बांगर, बिरमल शेळके, रमेश मासाळ, धर्मराज सातपुते, रामदास हाके ,युवराज हाके, संतोष हाके सुरेश हाके ,संग्राम हाके,
रेवन मासाळ,राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष ,उपाध्यक्ष व पदाधिकारी कार्यकर्ते सोनगिरी , रामकुंड ,वाकवड ग्रामस्थ हजाराचे संख्येने उपस्थित होते.